MB NEWS:भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपच्या धडकेत महिला ठार

 भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपच्या धडकेत महिला ठार



केज : शेतातून घराकडे जात असताना समोरून  भरधाव वेगात येणाऱ्या जीपने दिलेल्या धडकेत वृद्ध महिला व एका म्हैशीचा जागीच मृत्यू झाल्याची बुधवार (दि.१५) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केज-कळंब रस्त्यावरील माळेगाव जवळ घडली.

       तालुक्यातील माळेगाव येथील रुक्मिणी शंकर गुंठाळ (वय-६५) ही महिला शेतातील काम उरकून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास म्हैस घेऊन आपल्या घरी जात होती.याच सुमारास समोरून भरधाव वेगात येणाऱ्या (एमएच-२३/ई-४६२८) या जीपने जोराची धडक दिली. या अपघातात रुक्मिणी गुंठाळ व सोबत असलेल्या दुभत्या म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे जमादार खेडकर, खनपटे हे घटनास्थळी दाखल होऊन शासकीय रूग्णवाहिकेतून मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. अपघात घडताच मद्याधुंद अवस्थेत असलेल्या अनिल पारड (रा. मंजरथ ता. माजलगाव) या जीप चालक वाहन चालकाने वाहन न थांबविता कळंब शहराच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी त्या वाहनाचा पाठलाग करून चालकासह वाहन युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नेऊन लावले आहे. उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार