MB NEWS:वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचा कॉरिडर व प्रसाद योजनेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवावा चेतन सौंदळे यांची जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे मागणी

 वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचा कॉरिडर व प्रसाद योजनेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवावा

 चेतन सौंदळे यांची जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे मागणी 

  भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी एक वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथचा भारत सरकारच्या कॉरिडॉर व प्रसाद योजने अंतर्गत  समावेशाची मंजुरी मिळवण्याकरिताचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे भारत सरकारकडे पाठविण्याची मागणी बीड जिल्हयाचे नव निर्वाचित जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग कॉरिडॉर समितीचे सदस्य चेतन सौंदळे व वैजनाथ मंदीरातील पुजारांच्यावतीने गुरूवार दि.16 फेब्रू.रोजी दिपा मुधोळ-मुंडे यांची बीड जिल्हयाच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वागत करून लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र राज्यामधील स्वंयभू श्री.वैजनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ पुराण काळापासून धार्मिक,पुरातत्व, सामाजिक,एैतिहासिक दृष्टया पुण्यश्लोक साध्वी अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोध्दार केलेल्या भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग आहे.

  भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी भारत सरकारद्वारे देशातील महत्तवपूर्ण शक्ती व भक्ती स्थळ असलेल्या मंदीराला जोडण्याकरिता चौपदरी राष्ट्रीय महामार्ग निर्मिती,तीर्थक्षेत्र व त्याठिकाणापासून ईतर ठिकाणी रेल्वेसेवा सुरू करणे तसेच उद्योग,व्यापार,रोजगार,

स्वंय रोजगार,पर्यटन विकास तसेच विविध विकास कामांसाठी कॉरिडॉर व प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यात येत आहे.

    या योजने अंतर्गत काशी विश्वनाथ,उज्जैन महाकाल ज्योतीर्लिंग क्षेत्राचा विकास करण्यात आला आहे त्याचप्रमाणे द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग परळीसह महाराष्ट्रातील पाचही ज्योतीर्लिंगाचा व भारत देशातील ईतर ज्योतीर्लिंगाचा विकास करण्यासाठीचा पाठपुरावा प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग कॉरिडॉर कृती समितीच्या माध्यमातून तसेच भारत देशातील जगद्गुरू,शिवाचार्य,संत-महंत,लोकप्रतिनिधी,सर्व सद्भक्त तसेच श्री.वैजनाथ देवस्थान ट्रस्ट,परळी यांच्याद्वारे केला जात आहे.

  सदरील मागणीकरिता प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर समिती सदस्य चेतन सौंदळे यांच्यासह अशोक पुजारी,बालाजी पाटील,अनिल पुजारी, प्रा.डॉ.मिलींद सोनकांबळे व सदस्यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !