MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा





परळी वैजनाथ दि.२८ (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शास्त्रज्ञ डॉ सि.व्ही.रमण यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, प्रा.डॉ.राजकुमार जोशी, प्रा.डॉ. रंजना शहाणे, प्रा.डॉ विवेकानंद कवडे, कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉ सी.व्ही रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ विवेकानंद कवडे यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य मुंडे म्हणाले की,  आजचे आधुनिक युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या विज्ञान व तंत्रज्ञानाने जगात क्रांती घडवून आणली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आवश्यक असल्याचे मत डॉ मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कवडे यांनी तर आभार प्रा.अरुण चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार