MB NEWS:महाशिवरात्रीनिमित्त थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर्स असोसिएशन च्या वतीने खिचडी वाटप

 महाशिवरात्रीनिमित्त  थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर्स असोसिएशन च्या वतीने खिचडी वाटप 




परळी प्रतिनिधी

      महाशिवरात्रीनिमित्त परळी नगरीत दर्शनासाठी येणाऱ्या  सर्व भाविक भक्तांना थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनच्या वतीने  शाबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पी.एन.भदाणे यांच्या शुभहस्ते दि १८ रोजी सकाळी प्रसाद वाटप सुरू करण्यात आले. प्रसादाचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.


महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर  प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी परळी थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून शाबुदाणा खिचडी वाटप केली जात आहे, कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये यात्रा महोत्सव संपन्न होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनच्या वतीने दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी वैद्यनाथ मंदिराच्या परिसरामध्ये तब्बल विक्रमी १२ क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रभारी उपमुख्य अभियंता एच के अवचार,असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभाऊ हाडबे, शेखर स्वामी,  जयंती भाई पटेल,महादेव इटके , राजन,बंडू गित्ते, गोपाळ मुंडे, मधुकर नाईकवाडे, जगदीश अहिरे, हरिभाऊ बुरकुले, टी जे मुंडे, दशरथ गित्ते, सायस मुंडे,  कैलास तोतला, विवेक अवस्थी, दगडू भाळे,  गोविंद मुंडे, संतोष कांदे, ज्ञानेश्वर अंबुरे, बालाजी गित्ते, चंद्रकांत होळबे, मुंजाभाऊ गरड, सचिन स्वामी, ओमकार स्वामी, भगवान साकसमुद्रे ,क्षीरसागर प्रशांत,  आदिंची उपस्थिती  होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !