MB NEWS:तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून आणि दगडाने ठेचून खून

 तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून आणि दगडाने ठेचून खून




अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ भागात एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही थरारक घटना आज गुरुवारी (दि. ०९) सायंकाळी ६ वाजता घडली. नयूम अली चाऊस उर्फ बिल्डर (वय ३७, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) असे मयत तरुणाचे नाव आहे. 

 प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे ५ ते ६ हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने नयूम यास घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेऊन हल्लेखोरांनी फायटर, तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने नयूमवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नयूमचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक विनोद घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नयूम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !