MB NEWS:११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन

 ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन


परळी (प्रतिनिधि)

         श्री संत गजानन महाराज विश्वस्त मंडळ विद्यानगर परळी च्या वतीने प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज प्रगट दिन व चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्या दरम्यान भजनी मंडळाचे भजन,कीर्तन,अभिषेक,पूजा,असे सलग तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती , ७ते१० चरित्र पारायण,सकाळी १० ते १२ महिला भजनी मंडळाचे भजन, व रात्री ८ ते ११ कीर्तन होणार आहे. दि.११ रोजी माऊली महिला भजनी मंडळ संगम यांचे भजन, तर रात्री ह. भ. प.सच्चीदनंद महाराज यांचे कीर्तन , दि १२ रोजी गजानन महाराज महिला भजनी मंडळ परळी यांचे भजन ,रात्री ह. भ. प. बाळू महाराज नाव्हेकर यांचे कीर्तन, तर दिनांक १३रोजी प्रगट दिनी सकाळी १० ते १ या वेळेत ह.भ.प. श्री प्रभाकर महाराज झोलकर यांचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

         मागील १९ वर्षापासून या धार्मिक सोहळ्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे . विश्व स्त मंडळाच्या अथक परिश्रमातून याठिकाणी धार्मिक कार्यक्रमसह विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात येतात. यामधे रक्तदान,परिसर स्वच्छता अशा उपक्रमांचा सहभाग असतो.मंदिर स्थापनेपासून दर गुरुवारी श्रींना पिठल भाकरीचा नैवेद्य,हरिपाठ,आरती पूजा असे कार्यक्रम असतात शहरासह पंचक्रोशीतील भाविकांचा यात हिरीरीने सहभाग असतो. श्री गजानन महाराज पुण्यतिथी  अर्थात ऋषिपंचमी दिनी ही धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतो. 

       श्री गजानन महाराज प्रगट दिंन सोहळ्याची उत्कंठा परळी शहर सह पंचक्रोशीतील भाविकांना असते सलग तीन दिवस याठिकाणी यात्रेचे स्वरूप पहावयास मिळते. तमाम भाविक भक्तांना या अत्युच्च धार्मिक पर्वणी चा लाभ मिळतो याही धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त् मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


*११ते १३ फेब्रुवारी भरगच्च धार्मिक कार्यक्रम

*तीन दिवसीय चरित्र पारायण व हरिनाम संकीर्तन सोहळा

*विश्वस्त् मंडळाचे अथक परिश्रम

*मागील १९ वर्षांची अखंडित परंपरा

*धार्मिक कार्यक्रमसह रक्तदान,परिसर स्वच्छता असे विविध उपक्रम

*परळीसह पंचक्रोशीतील भाविकांना मिळतो धार्मिक पर्वणीचा लाभ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !