युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याशी अभयकुमार ठक्कर यांची विविध विषयावर चर्चा

 शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याशी अभयकुमार ठक्कर यांची विविध विषयावर चर्चा


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

शिवसेना उपनेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर या आज मंगळवार दि.28 फेब्रुवारी रोजी माजलगाव जि.बीड येथे शिव गर्जना मेळावा प्रसंगी आल्या असता त्यांची आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी भेट घेवून विविध विषयावर चर्चा केली.

आज मंगळवारी शिवसेना उपनेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर माजलगाव येथे शिव गर्जना मेळाव्यासाठी आल्या होत्या. यावेळी अभयकुमार ठक्कर व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. 

याप्रसंगी शिवसेना जेष्ठ नेते सतिशअण्णा जगताप, शहर संघटक संजय कुकडे, संजय सोमाणे किशन बुंदेले,श्रीनिवास सावजी, मनिष जोशी, अमित कचरे, लक्ष्मण मुंडे, बबन ढेंबरे,योगेश घेवारे, प्रकाश देवकर, योगेश जाधव, प्रा.जगदीश कावरे, नरेश मैड,सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, बजरंग औटी  आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या