MB NEWS:आरोग्यमंत्र्यांना आरोग्य मित्रच्या वतीने निवेदन

 परळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय सेवा कार्यरत करा-चंदुलाल बियाणी





आरोग्यमंत्र्यांना आरोग्य मित्रच्या वतीने निवेदन

परळी/ प्रतिनिधी-

परळी येथील उपजिल्हा रुग्णालय हे 100 खाटांचे आहे. परंतु येथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा व यंत्रणा पुर्ण क्षमतेने कार्यान्वित नाहीत. वास्तविक पाहता येथे ट्रामा केअर सेंटरची गरज असून अनेक रिक्त असलेल्या जागा भरुन परळी उपजिल्हा रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची गरज आहे. परळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय सेवा आणि यंत्रणा तातडीने कार्यरत करुन परळी शहर व परिसराचे  आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आरोग्य मित्र महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.


आरोग्य मित्र महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना परळी उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व नव्याने आवश्यक असलेल्या यंत्रणा व सुविधांबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांकडे बियाणी यांनी आरोग्य विभागाचे लक्ष वेधले आहे. प्रस्तूत निवेदनात म्हटले आहे की, परळी शहर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र  आहे. लाखों भाविकांची महाशिवरात्र ,श्रावण महिन्यात व दररोज रहदारी असते. तसेच थर्मल पाॅवर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, रेल्वे जंक्शन यासारखी औद्योगिक व रहदारीचे केंद्र शहरात आहे. शहरात व शहरालगत अनेक दुर्घटना व अपघात झालेले आहेत. उपचाराअभावी व वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळेच अनेकांना जीव गमवावा लागला आहे.


 शहरात उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांचे आहे परंतु अपुरा कर्मचारी वर्ग, धुळखात पडलेली यंत्रसामग्री, बंद अवस्थेत असलेली रक्त संकलन व साठवण केंद्र ,एखादा मयत व्यक्तीसाठी लागणारी शवपेटी अशा अनेक समस्यांना परळी व परिसरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.थोडं फार अपघात जरी असला तरी लगेच अंबाजोगाई येथे रूग्णाला  स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या जातात. या पार्श्वभूमीवर परळी येथील रुग्णालयात सुसज्ज इमारतीत आवश्यक त्या सुविधा तज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञानाच्या उपस्थितीत उपलब्ध होऊ शकतात असेही या निवेदनात म्हटले आहे. 


दरम्यान,सदरील उपजिल्हा रुग्णालयात फिजीशियन, आर्थोपिडीक सर्जन व इतर अत्यावश्यक पदभरती तात्काळ करावी व शहराचे महात्म्य व गरज समजुन अत्याधुनिक ट्राॅमा सेंटरची मंजुरी देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती विधानसभा सदस्य आ. धनंजय मुंडे, जिल्हा शल्य चिकीत्सक, बीड व उपजिल्हा रुग्णालय परळी यांना पाठविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !