MB NEWS:श्री सोमेश्वर महाराजांच्या पालखीचे केले स्वागत

 पवनराजे निधीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त फराळाचे वाटप



श्री सोमेश्वर महाराजांच्या पालखीचे केले स्वागत

परळी वैजनाथ प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी च्या वतीने आज शनिवार दि.18 फेब्रुवारी रोजी  महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीतील भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंडपणे महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर महाराजांची पालखीतील वारकर्‍यांना पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत  यांच्या हस्ते भाविक भक्तांना साठी फराळाचे वाटप करण्यात येते. सोमेश्वर महाराजांची पालखी वैद्यनाथ प्रभूला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून जाते. या पालखी सोबत येणार्‍या भाविक भक्तांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. 


      यावेळी पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्यासह सचिव गोविंद भरबडे, उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे ,कोषाध्यक्ष गोविंद मुंडे, सहसचिव प्रल्हाद काळे,संचालक सचिन भरबडे,ज्ञानेश्वर सातपुते, विनायक राठोड, परमेश्वर काळे, राउत सर,पवन सावंत, कर्मचारी अमर सुर्यवंशी, शुभम पालाकुडतेवार, अश्विनी कोरे सुजाता पवार,आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !