MB NEWS:धनंजय मुंडे यांच्या हस्ते माणिकनगरला झाले कल्याणकारी महादेव मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन

 धनंजय मुंडे यांच्या हस्ते माणिकनगरला झाले कल्याणकारी महादेव मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन



 परळी

 कल्याणकारी महादेव मंदिर न्यू माणिकनगर परळी या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाचे भूमिपूजन आज रोजी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकार, भाऊड्या कराड ,माजी उपनगराध्यक्ष सुरेश आण्णा टाक , बाळू लड्डा, चंद्रकांत टाक, अशोक नावंदे सर,दीपक शिंदे सर हे उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे यांचे औक्षण करण्यात आले.यानंतर पूजन करून व  श्रीफळ वाढवून मंदिर जीर्णोद्धार पायाभरणी कार्यक्रमाचे भूमिपूजन झाले. कार्यक्रमास  प्रशांत जोशी, अमित केंद्रे,धर्मराज खोसे सर,बालाजी साळुंके, केशव साळुंके,सतीश किलचे सर,गुरुलिंग स्वामी,विटेकर साहेब,रामेश्वर पराडकर, वैजनाथ कापसे  व माणिकनगर भागातील महिला व पुरुष यांच्यामोठ्या संख्येने उपस्थित होते.

   स्वागत कल्याणकारी बहुउद्देशीय प्रतिष्ठान परळी च्या वतीने अध्यक्ष सुरेश आण्णा टाक, सचिव  बाजीराव भैय्या धर्माधिकारी उपाध्यक्ष महेश शिंदे,सहसचिव रमेश काळे,कोषाध्यक्ष शंकर गवते,सदस्य रविलाल पटेल,राजाभाऊ चव्हाण,व्यंकटराव दहिफळे,सुनील देशमुख, सौ सुमनबाई राठोड,श्रीम.चंद्ररकलाबाई मगर,सौ शकुंतलाबाई आवाड, सौ इंदूबाई सांगळे यांनी केले.मा रमेश गंगाधरराव मुंडीक धारासुरकर यांना परळी स्वर्णकार समाज भूषण पुरष्कार मिळाल्याबद्दल वरील मन्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी या कल्याणकारी महादेव मंदिर जीर्णोद्धारसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.या जीर्णोद्धार कार्यक्रमास माणिकनगगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार