MB NEWS:परळीत पालकांकडून सत्कार

 विद्यावर्धिनी विद्यालयाच्या शाळेच्या शैक्षणिक सहलीचे उत्कृष्ट नियोजन 

परळीत पालकांकडून सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील विद्यावर्धिनी विद्यालय शाळेच्या शैक्षणिक सहलीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल परळीत पालकांकडून मुख्याध्यापक व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

             येथील विद्यावर्धिनी विद्यालयाची दि.३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रायगड,प्रतापगड,शिवनेरी हे किल्ले पाहिले.  अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर, महाड, पाली येथे गणपतींचे दर्शन केले, मांडवा बीच ते मुंबई,   मुंबई येथे ताज हॉटेल गेटवे ऑफ इंडिया भेट देऊन, वापस मुंबई ते मांडवा बीच अशी मनोरंजन फेरी मारली.श्री खंडोबा मंदिर जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतले.

 , जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.) (लघुरूप: जी.एम.आर.टी.; इंग्लिश: Giant Metrewave Radio Telescope ;)या स्थळाला भेट.हे स्थळ महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील खोडद येथील पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातलल्या दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. यांतल्या काही दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे येथेही भेट दिली. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणी भेटी व खरेदी केली.तसेच वाई येथील स्ट्रॉबेरी पासून विविध प्रकारचे चॉकलेट व सरबत तयार करण्याच्या कारखान्याला भेट व खरेदीही केली शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना परिसर ज्ञान प्राप्त व्हावे, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक व भौगोलिक माहितीचा अभ्यास करता आला. यात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. सहलीमुळे विद्यार्थ्यांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.  यामधून 120 विद्यार्थी व 12 शिक्षक यांनी सहभाग घेतला होता. राहण्याची व जेवणाची चांगल्या प्रकारची व्यवस्था केली होती.

        विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. सहलीमधे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची शैक्षणिक सहल आयोजन केल्याबद्दल सर्व विद्यार्थी व पालकांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करून आभार मानले आहेत. यावेळी सत्कारप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गोविंद चांडक, सुनील देशमुख, गोपाल पेटेवार, देशमुख मॅडम, धनराज कांदे, फड मॅडम, अरुण गीते, बालाजी घवले व इतर पालक सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार