MB NEWS:निटूर येथे दहा दिवस सांबकथा आयोजन

 निटूर येथे दहा दिवस सांबकथा आयोजन 





लातूर , प्रतिनिधी

श्री ष.ब्र.१०८ तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त निटूर येथे आज दि.१६ ते २५ फेब्रुवारीपर्यंत उपाचार्यरत्न बालतपस्वी द्वितीय सांब स्वामी महाराज यांच्या अमृतवाणीने सांब कथा सोहळा व कोटी जप यज्ञाचे सांब मठात आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ ते २४ फेब्रुवारी दररोज रात्री आठ वाजता तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांची  कथा सांगण्यात येईल.त्याचप्रमाणे दररोज सकाळी जप ,भजन, दर्शन होईल.

दि.२५ रोजी सकाळी पाळणा कार्यक्रम होईल.त्यानंतर ५००१ सुहासिनी महीलाची ओटी भरण्यात येणार आहे.या कार्यक्रमानंतर  तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांची भव्य मिरवणूक निघणार आहे.तसेच सर्व उपस्थित भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.निटूर व परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त सदभक्त निटूर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !