MB NEWS:महाराष्ट्रातील विविधतेवर आधारित गीतावर सादर केला नृत्यविष्कार

 ■महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात 

महाराष्ट्रातील विविधतेवर आधारित गीतावर सादर केला नृत्यविष्कार


परळी / प्रतिनिधी


महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय मोहा चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात मंगळवार दि 7 रोजी संपन्न झाले.महाराष्ट्रातील विविधतेवर आधारित  स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर करून आगळावेगळा कलाविष्कार सादर केला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतामुळे पालक अक्षरशा भारावून गेले होते.



 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव ऍड.अजय बुरांडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख,प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक सुदाम शिंदे,मुरलीधर नागरगोजे, सखाराम शिंदे, मोहा केंद्राचे केंद्र प्रमुख भीमाशंकर चेनलवाड, मुख्याध्यापक धनंजय देशमुख, उपमुख्याध्यापक सुरेश बुरांडे, पर्यवेक्षक विनायक राजमाने, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा जाधव आदि उपस्थित होत्या. 

 

या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध गाण्यावर नृत्यसादर केले. हीच आमुची प्रार्थना या प्रार्थना गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली.त्यानंतर महाराष्ट्रातील विविधतेवर आधारित शेतकरी गीत, मराठमोळ्या लावण्या, लोकगीते, हिंदी गीते, आदिवासी गीते,देशभक्तीपर गीत यावर पारंपारिक वेशभूषेत नृत्य अविष्कार सादर केला तर पाणी बचाव,मोबाईलचे व्यसन यावर मूक अभिनय सादर केला. या प्रसंगी सादर करण्यात आलेल्या मी सावित्री बोलतेय या एकपात्री नाटिकेमुळे प्रेक्षक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. लहान बालकांनी सादर केलेल्या गाण्याला टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनी, माता,पालक आदि मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !