इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भरगच्च कार्यक्रम

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भरगच्च कार्यक्रम 

रुद्राभिषेक,वृध्दाश्रमात आरोग्य तपासणी, अन्नदान, गुरांना चारा वाटप करणार-धनंजय गित्ते

परळी (प्रतिनिधी)

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना परळी विधानसभेच्या वतिने गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले असुन अनाथांचे नाथ म्हणुन प्रसिद्ध असलेल्या मुख्यमंत्र्याचा वाढदिवस अनाथांसोबत एक दिवस घालवुन त्यांच्यासोबत भोजन,आरोग्य तपासणी करत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांनी दिली.

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असुन यानिमीत्त खा. श्रीकांत शिंदे,खा.गजानन कीर्तिकर, मुख्य सचिव संजय मोरे,माजी मंत्री अर्जुन खोतकर,माजी मंत्री सुरेश नवले,जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी  प्रभु वैद्यनाथास रुद्राभिषेक करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी 10 वा. घाटनांदुर येथील गुरुदास सेवा वृध्दाश्रमातील वृध्दांच्या आरोग्याची तपासणी करुन औषधोपचार करण्यात येणार आहेत.दुपारी 12 वा.वृध्दाश्रमातील वृध्दांना अन्नदान करण्यात येणार आहे.त्यानंतर गोशाळेतील गुरांना चारा वाटप करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनाथांचे नाथ म्हणुन ओळखले जातात.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यास साजेसे असे अनाथांची सेवा करण्याचे उपक्रम आम्ही राबवत असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांनी सांगितले.या कार्यक्रमास  सचिन स्वामी बालासाहेब देशमुख  संजय कदम गावडे,दीपक जोशी सागर बुंदूले,रमेश लोखंडे ,नवनाथ सरवदे, गोविंद चिवडे, नवनाथ लोभे, वैजनाथ देशमुख नारायण फड,राजेश पुरभैये, गणेश सारस्वत,जगन्नाथ कदम रमेश पवार वैजनाथ लोखंडे पांडुरंग पाणखडे राजेश लोणीकर, हरी लोखंडे हनुमान सरवदे आदी शिवसैनिक उपस्थित  रहाणार आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!