MB NEWS:राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम दिव्यांग कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार

राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम दिव्यांग कर्तृत्ववान व्यक्तींचा  सत्कार 


परळी वै:-
                 राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त, शहरातील रामदेवबाबा मंदिर सभागृहात, संत गाडगेबाबा उत्सव समितीच्या  वतीने,कर्तृत्ववान दिव्यांग व्यक्ती हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सव समितीचे मुख्य संयोजक डॉ सुरेश चौधरी यांच्या सूचनेनुसार, व्यासपीठावर आमंत्रित दिव्यांग व्यक्तींना मान देत,कार्यक्रमाची सुरुवात, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन,डॉ. सुरेश चौधरी, भाजपचे जेष्ठ नेते दत्तप्पा ईटके,प्रा. माधव रोडे,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बहुद्दर भाई ,नाणेकर सर,मार्केट कमिटी सचिव बलविर रामदासी,जेष्ठ नेते विश्वनाथ गायकवाड,मनसे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर,नरेश हालगे,वैजनाथ बागवले शिवसेनेचे बालासाहेब देशमुख, संजय कदम गावडे, यांच्या सह ईतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ सुरेश चौधरी यांनी कार्यक्रमा मागील भूमिका सविस्तर विशद करताना म्हणतात की काम कारण्याची लाज नको आणि लाज वाटण्यासारख काम नको. हे त्यांचे ब्रीदवाक्य तरुणांना कर्तृत्वान आणि चरित्र्यवान बनण्याचा संदेश देते.याप्रसंगी संभाजी लांडे आपेगावकर यांनी सत्काराला उत्तरं देतांना, कार्यक्रम संयोजकांचे दिव्यांग सत्कार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जाहीर आभार मानले व दिव्यांग व्यक्ती कर्तृत्ववान कशा प्रकारे असतात याची सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात मिनाजुद्दीन मुलानी यांनी, शारीरिक अपंगत्वा पेक्षा मानसिक अपंगत्व घातक असल्याचे सांगितले.अनंत लोखंडे, अनिल बांगर शंकर ताटे,फिरोज सिंकदर,सुनीता कवळे,साजन लोहिया,उषा आघाव,फर्जना शेख यांच्या सह ईतर उपस्थित कर्तृत्ववान दिव्यांग व्यक्तीचा यथोचित सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,शशीशेखर चौधरी,रणजित देशमुख, संदिप कनकदांडे,संदेश क्षीरसागर,दीपक शिरसाट,अशोक कांबळे, शिवाजी देशमुख, बालासाहेब देधमुख,लहू हालगे,सागर बंदूले,अमर देशमुख,शर्वकुमार चौधरी, चारुदत्त करमाळकर,यांच्यासह ईतर सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा माधव रोडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बबलू मुलांनी यांनी केले तर,सूत्रसंचालन सचिन स्वामी यांनी केले.

------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार