MB NEWS:श्री गुरु सोपानकाका महाराज उखळीकर मंदिर येथे महाशिवरात्र महोत्सव व शिवलिलामृत पारायण सोहळा

 श्री गुरु सोपानकाका महाराज उखळीकर मंदिर येथे महाशिवरात्र महोत्सव व शिवलिलामृत पारायण सोहळा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       श्री गुरु सोपानकाका महाराज उखळीकर मंदिर मध्ये महाशिवरात्र महोत्सवानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
               महाशिवरात्र महोत्सवानिमित्त गुरुवार दि. १६/०२/२०२३ ते रविवार दि.१९/०२/२०२३ या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. दैनंदीन कार्यक्रम : श्री पहाटे ४ ते ६ काकडा आरती, स. ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, स. ७ ते १० शिवलिला अमृत पारायण सोहळा व्यासपीठ प्रमुख :- श्री.ह.भ.प. माधव महाराज उखळीकर,, १ ते २ रामायण, रात्री ९ ते ११ किर्तन व हरिजागर होणार आहे. या महोत्सवात श्री.ह.भ.प. लिंबाजी महाराज मांडवेकर  श्री.ह.भ.प.भागवताचार्य सुर्यभान महाराज आवलगांवकर,श्री.ह.भ.प. भागवताचार्य विठ्ठल महाराज उखळीकर यांची किर्तनसेवा होणार आहे.श्री.ह.भ.प. माधव महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होईल.दि. १८/०२/२०२३ रोजी दु. २  वा.श्री सोमेश्वर महाराजांची पालखी, श्री क्षेत्र जिरेवाडी येथून येईल व सोबत मेरु प्रदक्षिणा होणार आहे.
          या कार्यक्रमास फडावरील सर्व भाविक भक्त भजनी मंडळी, गायक, वादक, श्रोते मंडळी व महाराज मंडळी  हजर रहाणार आहेत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी  व्हावे असे आवाहन श्री. ह. भ. प. केशव महाराज उखळीकर, श्री. ह. भ. प. विठ्ठल महाराज उखळीकर, श्री.ह.भ.प. विश्वंभर महाराज उखळीकर, श्री.ह.भ.प. दिनानाथ उखळीकर, श्री. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज उखळीकर, श्री. ह. भ. प. चैतन्य महाराज उखळीकर श्री संत सोपानकाका महाराज मंदिर, उखळीकर भजनी फड, परळी वैजनाथ. यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !