MB NEWS: शिव आराधना कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण

 ● 'शिव आराधना' समारोहाने वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रात महाशिवरात्री महोत्सव बनला भक्तीमय !




•  परळीच्या  परंपरा जपणाऱ्या सुसंस्कृत कार्यक्रमांचे आयोजन आवश्यकच - पंकजाताई मुंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        

     द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथे महाशिवरात्री पर्वाचे प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्र आपली वैभवशाली पुरातन परंपरा आहे. महाशिवरात्रीच्या पर्व काळानिमित्त  'शिव आराधना' सारख्या परळीच्या  परंपरा जपणाऱ्या सुसंस्कृत कार्यक्रमांचे आयोजन आवश्यकच असल्याचे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले.

       महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला प्रभू वैद्यनाथ मंदिरच्या परिक्षेत्रात प्रथमच भक्तिमय संगीत-कला यांचा समावेश असलेला 'शिव आराधना' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यामध्ये शिव भजन, शिव स्तोत्र, शिव तांडव तसेच नृत्य कला प्रस्तुत करण्यात आल्या. श्री वैद्यनाथ मंदिर पार्कींग प्रांगण, बेलवाडी समोर, परळी वैजनाथ जि.बीड येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे यांचा हा कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा ठरला.


           या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेत्या पंकजाताई  मुंडे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ देवस्थान देवल कमेटी सचिव राजेश देशमुख होते. यावेळी देवल कमिटी विश्वस्त मंडळ सर्वश्री  प्रा. बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रा.प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, राजाभाऊ पुजारी तसेच दत्तापा इटके, जुगलकिशोर लोहिया, विकासराव डूबे, वैद्यनाथ अर्बन बँक चे अध्यक्ष विनोद समात, उपाध्यक्ष रमेश कराड, डॉ.शालिनीताई कराड, उमाताई समशेट्टी , संदीप लाहोटी, दीनदयाल बँके चे उपाध्यक्ष ॲड. राजेश्वरराव देशमुख, जयश्रीताई मुंडे. निळकंठ चाटे,सुचिता पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            परळी शहरात महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला प्रथमच  झालेल्या या महोत्सवात मोठ्या संख्येने परळीकर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी ॲड. अरुण पाठक,योगेश पांडकर, गोविंद चौरे,रवि वाघमारे,वैजनाथ रेकने व समस्त शिवभक्त परळी वैजनाथ यांनी  परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार