MB NEWS:● अभीष्टचिंतन:खासदार डॉ.प्रितमताई मुंडे - एक कार्यक्षम नेतृत्व
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खासदार डॉ.प्रितमताई मुंडे - एक कार्यक्षम नेतृत्व
खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी २०१५ ला खासदार पदाची शपथ घेवून लोकसेवेचा वारसा चालू ठेवला. फेब्रुवारी २०१५ च्या पहिल्याच अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये बीड जिल्हावासियांचा गेल्या ४० वर्षापासून रेंगाळत पडलेला परळी-बीड-नगर हा रेल्वे प्रकल्प करावा ही आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली. मोदी सरकारने गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याच अर्थ संकल्पात एक हजार कोटींची भरीव तरतूद करून २८०० कोटीच्या या प्रकल्पास मान्यता देत हा प्रकल्प थेट पंतप्रधानांच्या देखरेखी खाली असेल असे ही जाहीर केले. विकासाचा महाप्रोजेक्ट खासदार प्रितमताईनी मंजूर करून घेतला. तसेच शेतकर्यारचे विविध प्रश्न सभागृहात मांडले.
युरियासारख्या रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडतो त्यापेक्षा पर्यावरणपुरक जमिनींची उत्पादन क्षमता वाढवनार्या सेंद्रीय खतांचा वापर केला जावा. सरकारने याबाबत उपाय योजना करावी ही मागणी संसदेत केली. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी व दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती जिल्ह्यावर कोसळली असताना जिल्हाभर दौरा करून त्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी शेतकर्याकना मदत मिळवून दिली. शेतकरी व शेतमजूराच्या मुलानांही आरक्षण देण्याबाबत सरकारकडे आग्रही मागणी संसदेत केली. चारा टंचाई, शेती पीक व गुरांवर रोगराईचा परिणाम होऊ नये म्हणून त्यासाठी करावयाच्या उपाय योजना तसेच नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी हवामान खात्याने तंत्रशुध्द पध्दतीने अभ्यास करून त्याबाबत पूर्वसूचना देण्याबाबत ही सरकारला विनंती केली. ज्यामुळे शेतकर्यांना कांही प्रमाणात का होईना आपले नुकसान टाळता येईल. एवढेच नाही तर सांगली, कोल्हापूर या भागातील पूरग्रस्त बांधवांना अल्पशी मदत म्हणून परळी शहरामध्ये मदत फेरी काढून आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न ही खासदार प्रितमताई यांनी केला.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नंतर देशात ओ.बी.सी. जनगणना व्हावी अशी आग्रही मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनीच सभागृहात केली जो ओ.बी.सी. वर्गासाठी एक मोठा दिलासा आहे. बीड येथे स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान व जिल्हा रुग्नालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ८०० कन्यारत्नांचा नामकरण सोहळा आयोजित केला होता, जे एक जागतीक रेकॉर्ड आहे हा सोहळा खासदार प्रितमताईच्या उपस्थितीत पडला. स्वतः डॉक्टर असल्याकारणामुळे आरोग्य सुविधा व अडचणी यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. सर्वकष प्राथमिक उपचार या शासनाच्या धोरणानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हेल्थ वेलनेस क्लिनीक ही योजना दुष्काळाने वारंवार होरपळत असलेल्या बीड जिल्ह्यासाठी व्हावी यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्र्यांकडे आग्रही मागणी करून २५३ वेलनेस क्लिनीकचा शासन मंजूरी आदेश मिळवला.
शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना, जन औषधी योजना, स्वास्थ्य महाराष्ट्र अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जननि सुरक्षा योजना यामध्ये बीड जिल्हा मागील ४ वर्षात आघाडीवर राहिला आहे हे विशेष नमुद करावेसे वाटते, दुबई येथे कांही देशांच्या लोकप्रतिनिधींची पर्यावरणाविषयी चर्चासत्र झाले त्यामध्ये सौर उर्जेचे महत्व पटवून सांगत सक्रीय सहभागाबाबत आग्रह धरला. भाजप सत्तेच्या काळात बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे ३०० कोटींची विकास कामे होऊन जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेचा चेहरा मोहरा बदलला आहे. मेडीकल कॉलेजच्या एम.बी.बी.एस. चा प्रवेश कोटा दुप्पट करण्यात पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे योगदान जिल्हा विसरणार नाही. भव्य महाआरोग्य शिबीर, अपंगांसाठी साधन सामुग्री असे नव-नवे उपक्रम राबवुन खा. प्रितमताई आघाडीवर राहिल्या आहेत.
आपल्या जिल्ह्याचे विकासाचे आरोग्य धन्वंतरी रूपी खासदारांमुळे निरोगी व सदृढ झाले आहे हे मात्र नक्की. हजारो कोटी रूपयाचे शेकडो किलोमिटर रस्ते, चेन्नई – सूरत ग्रीन कोरिडोर मार्ग तसेच नागपुर ते गोवा समृद्धी मार्ग जिल्हयातून जाणार आहेत. पुढील काळात यामुळे जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात चेहरा-मोहरा बदललेला दिसेल. उद्योग धंदे वाढीसाठी व रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होण्यासाठी रस्ते व दळणवळणाच्या सोयी असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गामुळे बीड जिल्हा देशासी जोडला जात आहे. तीर्थक्षेत्र रेल्वे यात्रेमध्ये परळी वैजनाथ समावेश व कोल्हापूर-धनबाद ही परळीतून काशिला (वाराणसी) जाणारी सप्ताहिक रेल्वे तसेच परळी बिदर परळी- मुदखेड यासाठी रेल्वे मंत्रालयाने अर्थ संकल्पात केलेली तरतुद यामुळे पुढील वर्षात विद्युतवर चालणान्या रेल्वे सुरु होणार आहेत. परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासोबतच जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असा सोलापुर जळगाव रेल्वे मार्ग करण्यासाठी पण त्या प्रयत्नशील आहेत. व या अर्थ संकल्पात सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी तरतूद झाली आहे.
सन २०१९ मध्ये संपुर्ण देश कोविडच्या संकटात अडकलेला असताना खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी स्वतः पी.पी.ई. किट घालून रुग्णांना दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न व मदत बीड जिल्हयातील जनता विसरू शकणार नाही. औरंगाबाद, लातूर, सोलापूर, नगर या बाजारपेठा बरोबर बीड जिल्हाही विकसीत जिल्हा होतो आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना शेकडो कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले आहेत. जलजीवन मिशन हर घर जल योजनेत केंद्र सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेत बीड जिल्हतील पुर्ण ग्रामीण भागातील सर्व गावांचा या योजनेत समावेश असलेला हा एकमेव जिल्हा आहे. तसेच परळी रेल्वे स्टेशनचा अमृत योजनेत समावेश झाला असून रेल्वे स्टेशन अद्यावत होणार असून स्टेशनचा कायापालट होणार आहे, आता रेल्वे परळी स्टेशनवरून रेल्वे विद्युत मार्गाने पण धावणार आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. २०२३ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात कॉपर संदर्भात तसेच देशात नव्याने होणाऱ्या लेबरकोड मध्ये असंघटीत कामगार उदा. उसतोड कामगार, बीड़ी वर्कर यांचा समावेश व्हावा यासाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे.
अशा या विकासाभिमुख खासदार प्रितमताई यांचा मागील काळात फेम इंडिया व एशिया पोस्ट यांनी देशातील सर्वोत्तम २५ खासदारांची निवड केली त्यात प्रितमताई मुंडे यांचा समावेश झाला व पार्लमेंट बिझनेसच्या पब्लीक रेटींगमध्ये पहिल्या दहा खासदारांमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे.
अशा खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचा आज वाढदिवस, खासदारताई अनावधानाने राजकारणात आल्या, डॉक्टर म्हणून जे. जे. हॉस्पिटल येथे साहेबांच्या आग्रहास्तव काम करत असताना पेशंट म्हणून येणारी जिल्ह्यातील माणसे त्यांना वाचायला मिळाली त्यांचे सुख, दुःख अपेक्षा याची जाण झाली. त्यांचा आज खुप मोठा फायदा त्यांना खासदार म्हणून काम करताना झाला आहे. अशा या कुटूंब वत्सल, संवेदनशील व कार्यकत्यांशी जिव्हाळा ठेवणार्या नेतृत्वाचा, दुखी वंचितांसाठी लढणाऱ्या या नेतृत्वास वाढदिवसाच्या आम्हां सर्वांतर्फे मनापासून शुभेच्छा.
✍️राजेंद्र लोढा,
परळी वैजनाथ
९८२२८८१४९१
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा