सेवा निवृत्ती समारंभात सारेच गहिवरले

 ज्ञानबोधिनी शाळेच्या उभारणीत दगडगुंडेबाईंचे मोलाचे योगदान ; सेवा निवृत्ती समारंभात सारेच गहिवरले





परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.12 - येथील निवृत्त प्राथमिक शिक्षिका कुंदा दगडगुंडे यांच्या निवृत्ती समारंभाचे शाळेत आयोजन करण्यात आले होते.दगडगुंडे बाईंनी ज्ञानदानाचे काम तर केलेच पण ही शाळा उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे गौरौद्गार संस्थचे सचिव तथा ज्ञानबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे यांनी काढले.तर शाळेतील सेवा काळात सर्वांनी सहकार्य केल्याने मी कार्यकाळ पूर्ण केला असे दगडगुंडे बाई बोलतांना म्हणाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


सेवा काळ संपल्याने प्राथमिक शिक्षिका कुंदा दगडगुंडे यांचा ज्ञानबोधिनी प्राथमिक शाळेत संस्थेच्या वतीने हृद्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेकडून मुंडे यांनी दगडगुंडे बाईंना प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा, तर मोती मॅडम व कराड मॅडम यांनी साडी चोळी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी लक्ष्मण मुंडे बोलतांना म्हणाले की ज्ञानबोधिनी शाळा रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.या मध्ये आपल्या दगडगुंडे बाईंचे शिक्षक म्हणून मोठे योगदान आहे,त्यांच्या कार्यपद्धती नुसार सर्व शिक्षकांनी काम करावे असे म्हणत सेवा काळातील कार्याचे कौतुकही केले.


सर्व शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम करताना शाळेतील विद्यार्थी कसा परिपूर्ण होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.या सत्काराबद्दल मी सदैव ऋणी असेल,तसेच शाळेचे सर्व नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत असे आपल्या मनोगतात कुंदा दगडगुंडे म्हणाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे सर,आत्माराम शेप सर,सोमनाथ गोपनपाळे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जाधव सर यांनी केले यावेळी.यावेळी प्रतिक्षा घोडके यांनी आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमासाठी शिक्षकवृंद कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !