MB NEWS:माजलगावात आई - वडिलांच्या पुण्यस्मरणानिमीत्त अखंड हरिनाम सप्ताह ह.भ.प बाळु महाराज जोशी यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत कथा

 माजलगावात आई - वडिलांच्या पुण्यस्मरणानिमीत्त अखंड हरिनाम सप्ताह



 ह.भ.प बाळु महाराज जोशी यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत कथा


ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन

------

माजलगाव / प्रतिनिधी: 

कै.बप्पासाहेब व्यंकोबा सोळंके, वै.कस्तुराबाई बप्पासाहेब सोळंके यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त शहरातील दत्त मंदिर समता कॉलनी येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन दि.२७ मार्च २०२३ते दि.०३ एप्रिल २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. त्याचबरोबर विठ्ठल रूक्मिनी, ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज मुर्ति प्राणप्रतिष्ठा वर्धापनही साजरा करण्यात येणार असुन याचा भाविक - भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प.तुकाराम  सोळंके परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

       या हरिनाम सप्ताहात पहाटे ४ ते ६  काकडा भजन, सकाळी ६ ते ७  विष्णुसहस्त्रनाम, ७ ते ११  ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ११ ते १  तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारी  २ ते ६ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७  हरिपाठ असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. कथा प्रवक्ते ह.भ.प. बाळू महाराज जोशी हे आहेत. त्यांना हार्मोनियमवर ह.भ.प. सर्जेराव म. सपकाळ, ह.भ.प. आकाश म. राव, गायक ह.भ.प. मनोज महाराज शिंदे, ह.भ.प. माउली म. मुळे तर तबल्यावर ह.भ.प. संतोष म. कदम, ह.भ.प. विलासदेव धर्माधिकारी हे साथ संगत देणार आहेत. पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. महारूद्र म. पवार हे करणार आहे. दि.१ एप्रिल रोजी रात्री ह.भ.प. बाळू महाराज जोशी यांचे तर दि.२  एप्रिल रोजी ह.भ.प.श्रावण महाराज अहिरे यांचे हरिकिर्तन तर दि.३ एप्रिल रोजी ह.भ.प. एकनाथ महाराज माने यांचे काल्याच्या किर्तन व यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील गायक, वादक, परमार्थ प्रेमी व भाविक - भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मोतीराम सोळंके, ह.भ.प.तुकाराम नाना सोळंके, बालासाहेब सोळंके, गणेश सोळंके, विलास बळीराम सोळंके, सुरेश सोळंके, दिलीप सोळंके व सोळंके, चिखलीकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !