MB NEWS:परळी तालुक्यात बालविवाह :150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल

 परळी तालुक्यात बालविवाह :150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
        तालुक्यातील नंदागौळ येथे बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्प लाईन बीड यांच्याकडून ग्रामसेवकास देण्यात आली.हा बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यापुर्वीच हा विवाह पार पडला. याप्रकरणी ग्रामसेवकाने संबंधित नवरा नवरी,नातेवाईक, मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा,पुरोहित,फोटोग्राफर,आचारी व वर्‍हाडी अशा तब्बल 150 ते 200 जणांविरुद्ध फिर्याद दिली असुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, चोपनवाडी ता.अंबाजोगाई येथील १६ वर्षिय मुलगी व नंदागौळ येथील २४ वर्षिय मुलगा असा विवाह ठरला होता.आज दिनांक 13/03/2023 रोजी  हा विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्प लाईन बीड यांच्याकडून ग्रामसेवकास देण्यात आली. त्यानंतर ग्रामसेवक ज्ञानेश्वर शामराव मुकाडे हे नंदागौळ येथे गेले परंतु त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हा विवाह पार पडला होता.या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे फोन आल्या बरोबर नंदागौळ येथे गेलो. तेव्हा तेथे लग्न संभारभ पुर्णपार पडलेला होता. लग्नातील सामान माणसे उचलुन घेवुन पळुन जात होते. व मी त्या लोकांना विचारपुस केली असता कोणी काही एक सांगायला तयार नव्हते असे ग्रामसेवक ज्ञानेश्वर शामराव मुकाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
       याप्रकरणी ग्रामसेवकाने संबंधित नवरा, नवरी,आई वडिल,मामा,नातेवाईक, मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा,पुरोहित, फोटोग्राफर, आचारी व वर्‍हाडी 150 ते 200 जणांविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 1929 या कायदा प्रमाणे परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !