इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:परळी नगर परिषदेतील सेवानिवृत कर्मचाऱ्यांचे 5 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

 परळी नगर परिषदेतील सेवानिवृत कर्मचाऱ्यांचे 5 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन




परळीवैजनाथ: परळी नगर परिषदे सेवानिवृत कर्मचारी 7 व्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता मिळावा व विविध मागण्यासाठी 5 एपीलपासून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर  धरणे आंदोलन करणार आहेत.

  

     परळी नगर परिषदेतील सेवानिवृत कर्मचारी रजा रोखीकरण, रक्कम व सेवाउपदानाची रक्कम मिळावी म्हणून 18 जूलै 2022 रोजी उपोषणास बसले होते. लेखी आश्वासनानुसार काही लोकांना सेवा उपदान व कर्मचाऱ्यांना राजारोखीच्या 30 टक्के रक्कम मिळाली होती . 7 व्या वेतनाचा दुसरा हप्ता दोन महीन्यात देण्याचे  आश्वासन दिले होते. तसेच सेवा उपदानाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी पाळले नाही. 30 टक्के  रक्कम ज्या सेवानिवृत कर्मचायांना मिळाली नाही त्यांना ती मिळावी म्हणून 10.8.22 रोजी सेवानिवृत कर्मचाऱ्यानी उपोषण केले होते परंतु त्यावेळी लेखी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्याधिकाऱ्यानी केली नाही.


    सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता मिळावा व ज्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांना रजारोखीकरणाची रक्कम कमी देण्यात आली त्यांना उर्वरीत रक्कम मिळावी म्हणून आंदोलन केले होते. परंतू मुख्याधिका-यांनी लेखी आश्वासनच दिले. दि 8/2/2023 रोजी सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी 7 या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता व महागाई भत्त्याची थकीत रक्कम व  आश्वासनाची पूर्तता करावी म्हणून मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते.

        या निवेदनाची आजपर्यंत दखलही घेतली गेली नाही.2008 से 2021 पर्यंत 90 पेक्षा जास्त कर्मचारी सेवानिवृत झालेले आहेत. जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना सेवा उपदान व रजा रोखीकरणाची रक्कम दिलेली नाही. सेवानिवृतीच्या वेळेस फक्त जी.पी.एफ दिले जाते. परंतु परळी नगर परिषदेत मात्र न्याय मिळत नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णायक आदेश द्यावा म्हणून सेवानिवृत्त कर्मचायांनी जिल्हाधिकारी कार्यालयापूढे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.परळी नगरपरिषद सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी  मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहान सेवानिवृत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे व सरचिटणीस श्री जगनाथ शहाणे यांनी  केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या