MB NEWS:पहाटे 5 वाजता स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 पिंपळनेर हद्दीमध्ये घोडका राजुरी शिवारात गुटख्याच्या गोदामावर छापा  52 लाख रुपयांचा गुटखा जप्त 

पहाटे 5 वाजता स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 

पिंपळनेर - बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बीड -परळी महामार्गावर घोडका राजुरी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेची रात्री अलर्ट ऑपरेशन करत असताना गुप्त  माहिती मिळाली होती

त्या माहिती नुसार पाहाटे 5 वाजता घोडका राजुरी फाट्यावर बाजूला असणाऱ्या गोदाम मध्ये गुटख्याची खुलेआम गोदाम मध्ये गुटक्याची भोताची व गोण्याची आवक जावक करत असताना बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांच्यासह पीएस‌आय भंगतसिग दुलत ,  पोलीस कर्मचारी मनोज वाघ प्रसाद कदम विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे नारायण कोरडे अशोक कदम अतुल हराळे यांनी गोदाम वर छापा मारून एकूण 94 भोते गुटखा व 94 तंबाखूच्या  गोण्या स्कार्पिओसह मुद्देमाल एकूण 52 लाख 9 हजार रुपये जप्त करून गुटखा गुटखा विक्री करणारा गुटखा किंग महारुद्र मुळे  रा.घोडका राजुरी  व सत्यप्रेम घुमरे‌ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर बाळासाहेब वरेकर फरार आहे यामुळे पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे करणाऱ्याचे चांगले धांबे दणाणले आहेत याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !