युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:लक्ष्मण वानखेडे यांचे निधन,नितीन वानखेडे यांना पितृशोक

 लक्ष्मण वानखेडे यांचे निधन,नितीन वानखेडे यांना पितृशोक

परळी (प्रतिनिधी) -येथील बँक कॉलनीतील रहिवाशी व हॉटेल मैत्री चे संचालक नितीन वानखेडे यांचे वडील 

लक्ष्मण नारायण वानखेडे यांचे शुक्रवारी सकाळी हृदय विकाराने दुःखद निधन झाले.   त्यांच्या पश्चात पत्नी, अमोल, नितीन आणि आकाश अशी तीन मुले,एक मुलगी सुना,जावई,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. शुक्रवारी 

दुपारी 3.00 वाजता शहरातील सार्वजनिक स्मशाभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . या वेळी व्यापारी,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अदि क्षेत्रातील मान्यवरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

               त्यांचा राख सावडन्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. वानखेडे परिवारावर कोसळलेल्या MB न्युज चॅनल सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या