MB NEWS:महादेव ईटके व प्रा.डॉ.बाबासाहेब शेप यांच्या निवडीबद्दल मित्र मंडळीकडून सत्कार

 महादेव ईटके व प्रा.डॉ. बाबासाहेब शेप यांच्या निवडीबद्दल मित्र मंडळीकडून सत्कार





परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी शहरातील महादेव ईटके यांची दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळ सदस्यपदी निवड व वैद्यनाथ कॉलेज  येथील इतिहास विभाग प्रमुख,प्रा. डॉ. बाबासाहेब शेप यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्तीबद्दल परळीतील मित्र मंडळीच्या वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


 शहरातील न्यू भारत फोटो स्टुडिओ दालनात रविवार दि. 26 मार्च रोजी यावेळी श्री महादेव आप्पा ईटके यांची दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळ सदस्यपदी (Board of Management) निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच वैद्यनाथ महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाबासाहेब शेप यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. श्री महादेव इटके यांचे व्यक्तिमत्व मनमिळाऊ असल्याने व स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब , लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे  निकटवर्तीय म्हणून ओळख आहे . तर प्रा. डॉ. बाबासाहेब शेप यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जीवन आणि कार्य या विषयावर Phd केली आहे. तसेच स्व. लोकनेते मुंडे साहेबांच्या कार्यावर ग्रंथ लिहिला आहे. संशोधन क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंधाचे वाचन केले आहे. त्यांची अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे.

     यावेळी जेष्ठ नेते उत्तम दादा माने,  वैजनाथराव सोळंके, नितीन समशेट्टे, अश्विन मोगरकर, बंडू आघाव सर, रामेश्वर महाराज कोकाटे, तानाजी व्हावळे, सरपंच महेश सिरसाट, यशवंत बापू चव्हाण, गोविंद चांडक भैया , अशोक मस्कले सर, पत्रकार प्रतिनिधी संभाजी मुंडे, पत्रकार प्रा.रवींद्र जोशी, पत्रकार प्रा. प्रवीण फुटके, पत्रकार स्वानंद पाटील, पत्रकार सचिन भांडे, पत्रकार महादेव गित्ते, पत्रकार विकास वाघमारे,  महादेव मुंडे, संतोष घुंबरे पाटील उपस्थित होते. या सत्कारावर उत्तर देत असताना यांनी डॉ. शेप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील इतिहास अभ्यास मंडळावर माझी आदरणीय कुलगुरू प्रोफेसर ,डॉ. प्रमोद येवले साहेब यांनी नियुक्ती केल्याबद्दल आभार मानले. व विद्यार्थी व प्राध्यापकांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठीचे आश्वासन याप्रसंगी दिले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घुंबरे पाटील व सहकार्याने परिश्रम घेतले.सूत्रसंचालन पत्रकार प्रा.रवींद्र जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंद चांडक यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !