MB NEWS:नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा

 परळीत १ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा ४३वा.सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा!


नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-


        ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने यावर्षी ४३ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा येत्या १ मे रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.


         गेल्या ४२ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा  सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे १०.३५ वा. संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ५०१ रु.नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे.या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या उपनीत मुलांची नावनोंदणी करण्यासाठी बंडू महाराज टिंबे (दक्षिणमुखी गणेश मंदिर परळी वै.)मो.क्र.८९७५२९२१११, सचिन जोशी (जोशी मेडिकल मोंढा परळी वै.) मो.क्र.९९२२२६१७४०, गिरीश प्रयाग (प्रयाग इलेक्ट्रिकल I D B I बँकेसमोर) ९०२८८१११७२, श्रीकांत करमाळकर  मो. क्र. ७०२०८०१३७८,जयराम गोंडे (स्माईल फोटो स्टुडीओ) मो.क्र.९८२३१३७२९५, प्रमोद औटी, राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक मो.क्र. ९०२८८१११७३, हेमंत लोंढे (सिरसाळा)मो.क्र.९४२३७५७२१५, प्रदीप कुलकर्णी (घाटनांदूर) मो.क्र.९४२२२४०७६१, शैलेश कुलकर्णी (अंबाजोगाई) मो.क्र. ९४२२३३०३३७, प्रशांत गुरु जोशी (धर्मापुरी) ७२७६३४३७१२, कृष्णा गुरु जोशी (नागापूर) मो.क्र.९६८९८५११६१, विश्वांभर देशमुख ९६५७६५६९५१ (गोविंदा गोविंदा जनरल स्टोअर्स) मो.यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी.दा. सावरकर प्रबोधिनी, पेशवा युवा संघटन,ब्राह्मण महिला आघाडी,ब्राह्मण युवक संघटना आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार