MB NEWS:आमदार शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - सुषमा अंधारे

 आमदार शिरसाट यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - सुषमा अंधारे




परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा..

      आमदार संजय शिरसाट यांनी माझ्यावर टीका करतांना जी आर्वाच्य भाषा वापरली, माझी बदनामी केली या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परळीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. याशिवाय परळी पोलिसांत देखील त्यांच्याविरुद्ध बदनामी केल्याप्रकरणी तक्रार देण्यास सुषमा अंधारे गेल्या मात्र पोलीसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला.


        शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ती करत असतांना लफडेबाज असा उल्लेख केल्यामुळे शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, परळी दौऱ्यावर असलेल्या अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केले. अंधारे म्हणाल्या, आमदार संजय शिरसाट यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. परळी पोलीस ठाण्यात बदनामी केल्याबदल  तक्रार दाखल करण्यासाठी त्या गेल्या मात्र पोलीसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला. यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे. मी विरोधकांना प्रश्न विचारताना अत्यंत सन्मानाने बोलते, कारण माझ्यावर माझ्या कुटूंबाचे चांगले संस्कार झालेले आहेत.सभ्य व सुसंस्कृत नेतृत्वाच्या आदेशाने मी काम करते. आमदार संजय शिरसाटांना भाऊ म्हणलेले का टोचले ? आतापर्यंत अजित पवार यांना दादा म्हणलेले कधी टोचले नाही. कारण ते सज्जन व सभ्य संस्कृतीतील आहेत. ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहिती नाही त्या शिरसाटांना भाऊ म्हणलेले टोचले असेल. मुळात यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत गलिच्छ आहे.


        यामुळे माझ्या पक्षाने विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र कुठेही पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. मी कायद्याची अभ्यासक आहे, त्यांनी बोललेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला चांगला कळतो. त्यामुळे शिरसाटांवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा. परंतु मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा पोलीसांवर दबाव आहे असे त्यांनी सांगितले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार