MB NEWS:धनंजय मुंडेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला!

 धनंजय मुंडेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला!

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 283 कोटींच्या सुधारित आराखड्यास मंजुरी देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश व्हावा, यासाठीचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश


वैद्यनाथ वन उद्यानाला मिळणार निधी!


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास, पर्यटन व वन विभागाची एकत्र बैठक


मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीश महाजन, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती


धनंजय मुंडेंनी मानले आभार


मुंबई (दि.16) - आ. धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाच्या विकासासंदर्भात केलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत आज झालेल्या बैठकीत नगर विकास विभागाचा तीर्थ क्षेत्र विकास निधीतून वैद्यनाथ तीर्थ क्षेत्र विकासाच्या सुधारित 283 कोटींच्या आराखड्यास प्रस्ताव प्राप्त होताच मंजुरी देण्याची घोषणा केली आहे. 


धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील दालनात यासाठी नगरविकास विभाग, पर्यटन विभाग, वन विभाग आदी विभागांचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.


वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा 133 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे, यात वाढीव विकास कामे व प्रकल्पाचा वाढलेला दर लक्षात घेत तयार करण्यात आलेला 283 कोटींचा सुधारित आराखडा प्राप्त करून, तो मान्य करून यातून पहिल्या टप्प्यात करावयाच्या कामांचा निधी देखील तातडीने मंजूर करून वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाला दिले. 


त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या 'प्रसाद' योजनेत परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा समावेश व्हावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने शिफारशीसह केंद्र सरकार कडे पाठवावा, अशी धनंजय मुंडे यांनी मागणी केली होती, त्याला अनुसरून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्या कडून मागवून तातडीने केंद्राकडे शिफारशीसह पाठविण्याचेही निर्देश या बैठकीत देण्यात आले. 


वैद्यनाथ मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर वन विभागाच्या दाट झाडी क्षेत्रात उपलब्ध जागेत वैद्यनाथ वन उद्यान विकसित करण्यात यावे, असा प्रस्ताव वन विभागाच्या सहकार्याने पर्यटन विभागास पाठविण्यात आलेला आहे, या प्रस्तावास मंजुरी देऊन वैद्यनाथ वन उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, हा निधी देखील उपलब्ध करून देण्याचे निर्देश पर्यटन मंत्री मंगप्रभात लोढा यांनी विभागाला दिले आहेत. 


परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाच्या विकासासाठी सुधारित तीर्थ क्षेत्र विकासाच्या आराखड्यास मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर प्रसाद योजनेत समावेष करावयाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणे यांसह परळी शहराच्या विकासासंदर्भातील सर्वच मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांसह उपस्थितांचे आभार मानले. 


या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांसह मुख्यसचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, पर्यटन विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ - मुंडे, वाल्मिक अण्णा कराड यांसह परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कांबळे, आर्किटेक्ट के के बांगड यांसह आदी उपस्थित होते.


परळी वैद्यनाथ तीर्थ क्षेत्र विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने परळी शहर व परिसराच्या विकासात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !