MB NEWS:कन्हेरवाडी सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात

 कन्हेरवाडी सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात 



प्रतिनिधी :

परळी वै. : दि. २२ मार्च २०२३ रोजी परळी वै. तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी गावातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवात समितीची बैठक संपन्न झाली. या जयंती उत्सव समितीच्या बैठकीचे अध्यक्ष भास्कर नाना रोडे, गंगाधर अप्पा रोडे , प्रभाकर गवळी, आदी जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये जयंती उत्सवात समितीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी दि. २८ एप्रिल २०२३रोजी कन्हेरवाडी येथे साजरी होणार्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कन्हेरवाडीच्या अध्यक्षपदी उपा. आयु. सिध्दोधन छाया भारतराव घाटे, कोषाध्यक्ष उपा. आयु.   महादेव  वाघमारे,सचिव  उपा. आयु. रवि प्रभाकर रोडे उपाध्यक्ष उपा. आयु. आमोल वसंत रोडे, सहकोषाध्यक्ष उपा. आयु. सचिन लांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सम्राट अशोक नगर येथील लहान थोर आणि जेष्ठ मंडळींनी उपस्थित राहुन जयंती उत्सव समितीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार