MB NEWS:जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव :पौरोहित्य करणाऱ्या स्वामींचा सत्कार

 जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव :पौरोहित्य करणाऱ्या स्वामींचा सत्कार 


श्रीमद काशी जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या आज्ञानुसार समस्त वीरशैव समाज आयोजित जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव जयंती  कार्यक्रमामध्ये प्रत्येक पूजा विधी ज्यांच्या शिवाय संपन्न होत नाही.प्रत्येक कार्यात ज्यांचे मोलाचे योगदान असणारे मठपती दयानंद स्वामी. धनंजय स्वामी.. महेश स्वामी.. शशिकांत स्वामी योगेश स्वामी.. सोमनाथ स्वामी आणि भीमाशंकर स्वामी सर्व स्वामींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली

             पंचकलशाची पूजा करुन श्रीमद जगद्गुरू पंचाचार्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले महाराष्ट्र वीरशैव सभा शाखेच्या बीड जिल्हाध्यक्षा सौ सुरेखाताई मेनकुदळे, माजी नगराध्यक्षा सौ सरोजिनीताई हालगे,श्री वैद्यनाथ भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती गोदावरीबाई चौधरी,शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ रमाताई आलदे,जगद्गुरू रेणुकाचार्य जयंती चे आयोजन करणाऱ्या सौ शिवकन्याताई निर्मळे तसेच सौ अन्नपूर्णाताई निर्मळे व सौ सुवर्णाताई ओपळे यांच्या हस्ते सर्व अतिथी स्वामींची पाद्यपूजा करुन स्वामींना शाल, हार, श्रीफळ तसेच पंचाचार्यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच  श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आदरणीय सौ सुरेखाताईंचा शाल, हार, श्रीफळ तसेच पंचाचार्यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला  मंगलआरती  करून प्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशी पिठाच्या केंद्र संचालिका सौ चेतनाताई गौरशेटे यांनी केले. सूत्रसंचालन सौ ज्योतीताई बर्दापुरे यांनी केले तर सौ विद्याताई स्वामींनी आभार मानले  या कार्यक्रमाला असंख्य भक्तगणांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व भजनी मंडळाने परिश्रम घेतले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार