MB NEWS:खरिपातील अतिवृष्टीची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

 धनंजय मुंडेंच्या सभागृहातील दणक्यानंतर प्रशासन खडबडून जागे, अनुदान वितरण करण्यास सुरुवात!




खरिपातील अतिवृष्टीची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात


बीड (दि. 21) - अवकाळीची मदत तर दूरच, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 410 कोटी अद्याप मिळाले नाहीत असा आरोप करत धनंजय मुंडे यांनी विधानसभा सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी काळातील मदतीचे वितरण सुरू झाले आहे. 


खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जे नुकसान केले, त्या नुकसानीच्या भरपाई पोटी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास सादर केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे शासनाने 410 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती, मात्र याला चार महिने उलटले, दिवाळी तर सोडाच पण आता पाडवा आला तरी त्या मदतीचे अद्याप वितरण नाही, कधी सॉफ्टवेअर तर कधी डेटा तर कधी काही अडचणी सांगितल्या जातात, यावरून धनंजय मुंडे यांनी सोमवारी सरकारला धारेवर धरले होते. 


यावेळी अवकाळी पावसामुळे सध्या जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तर करूच मात्र मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीची रक्कम तातडीने वितरित करण्यात येईल, असे आश्वासन सरकार पक्षाच्या वतीने देण्यात आले होते; त्यानंतर सूत्रे तातडीने हलली व आज लगेचच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार