MB NEWS:चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड चे मठाधिपती प. पू. श्री. माधवानंद महाराजांचा परळीत अमृत महोत्सव : शोभायात्रा व गुरुपरंपरेच्या कार्यक्रमाचे आयोजन

 चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड चे मठाधिपती प. पू. श्री. माधवानंद महाराजांचा परळीत अमृत महोत्सव : शोभायात्रा व गुरुपरंपरेच्या कार्यक्रमाचे आयोजन 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड चे मठाधिपती प. पू. श्री. माधवानंद महाराजांचा परळीत अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा,शोभायात्रा व गुरुपरंपरेच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.28 रोजी करण्यात आले आहे.


    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, स्व. मनोहर पंत बडवे सभागृह, देशपांडे गल्ली परळी वै. येथे मंगळवार दि. २८/०३/२०२३ रोजी श्री. माधवानंद महाराजांचा परळीत अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.(७५ वी) निमित्त श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ नगरीमध्ये महाराजांचे आगमन होईल त्यानंतर यांद्रीय शांती,श्री वैद्यनाथ प्रभुस अभिषेक.सकाळी ८.३० वा. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा निघेल. श्री विठ्ठल मंदिर, स्व. मनोहर पंत बडवे सभागृह, गणेशपार रोड, परळी वै. पर्यंत शोभायात्रा निघेल. याठिकाणी सकाळी ९ ते ११ वा. श्री विश्वंभरास लघु रुद्र रुद्राभिषेक, गुरूमंत्र, पाद्यपुजन दुपारी १२ ते १ विश्वांभर दिव्य दर्शन ,दुपारी १ ते ४ महाप्रसाद सायं. ५ ते ६ संगीत भजन राधाकृष्ण महिला मंडळ, परळी वैजनाथ.सायं. ६ ते ८ श्री प्रदोष पूजा, लिंग दर्शन आदी कार्यक्रम होतील. 

      तरी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त गुरुबंधु व सर्व समाज बांधव, परळी वैजनाथ. जि. बीड यांच्याकडून करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !