MB NEWS:आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु

 आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु

बीड दि.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया माहे फेब्रुवारी पासून राबविण्यात आली असून दि.02/03/2023 पासून पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश अर्ज ऑनलाईन रित्या नोंदणी करण्यासाठी अधिकृत रित्या वेबसाईड सुरु आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांची ऑनलाईन नोंदणी विहित कालावधीत करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ही बीड जिल्हयातील खाजगी, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थ साहित,तत्वावरील प्राधान्याने इंग्रमी माध्यमाच्या शाळेवर राबविण्यात येते. जिल्हयातील 225 शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे. 1827 एवढी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या परिसरातील उपलब्ध असलेल्या नामांकित शाळेंमध्ये आपल्या मुलांचे प्रवेश ऑनलाईनरित्या नोंदणी करुन प्रवेशाची संधी प्राप्त करुन घ्यावी यासाठी तालुकास्तरावर मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हे या प्रवेश प्रक्रियेचे नियंत्रण अधिकारी आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. प्रवेश फॉर्म भरतांना काही पालकांना अडचणी आल्यास त्यांनी संबंधित मदत कक्षाची मदत घेऊन आपल्या मुलांचे फॉर्म ऑनलाईन करावेत.

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन आरटीई पोर्टलवर पालकांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन पालकांनी आपल्यापाल्यांचे अर्ज दि.01 मार्च  ते 17 मार्च 2023 पर्यंत रात्री 12.00 वाजेपर्यंत सादर करावेत. https://student.maharashtra.gov.in ही ऑनलाईन वेबसाईड सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकांने चुकीचे अर्ज किंवा एकाच विद्यार्थ्यांचे एकापेक्षा अनेक अर्ज नोंदणी करु नये . असे निदर्शनास आल्यास संबंधित तालुका स्तरीय प्रवेश पडताळणी समिती असे अर्ज प्रवेश प्रक्रियेतून बाद करतील. प्रवेश फॉर्म भरला म्हणजे संबंधित पाल्यांचा नंबर लागेलच असे निश्चित सांगता येणार नाही. सदर प्रक्रियेची राज्यस्तरावरुन प्रवेशाची लॉटरी काढली जाते. निकषाप्रमाणे पात्र मुलांची जागेच्या प्रमाणात निवड यादी व तेवढयाच प्रमाणात प्रतिक्षा यादी जाहीर केली जाते. नंबर लागलेल्या मुलांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे प्रवेशाबाबत कळविण्यात येते. वंचित व दुर्बल घटकातील सर्व पात्र लाभार्थी पालकांनी प्रवेशाबाबत आवश्यक सर्व कागदपत्रे व नियमाचे पालन करुन विहित कालावधीत वेबसाईटवर अर्ज भरावेत असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार  व शिक्षणाधिकारी (प्रा) श्रीकांत कुलकर्णी यांनी संयुक्तरित्या केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार