MB NEWS:दि. २३ मार्च रोजी एका लग्नाची पुढची गोष्ट' या कौटुंबिक नाटकाचे आयोजन

 बहुप्रतिक्षित पोदार स्विमिंग अरेनाचा भव्य शुभारंभ २६ मार्चला

 दि. २३ मार्च रोजी एका लग्नाची पुढची गोष्ट' या कौटुंबिक नाटकाचे आयोजन


परळी / प्रतिनिधी,


राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, पोदार लर्न स्कूल, परळी येथे दि. २६ मार्च रोजी मराठवाड्यातील अत्याधुनिक जलतरण तलावाचा भव्य शुभारंभ होणार आहे. हा उद्घाटन सोहळा जलतरण स्पर्धेमध्ये विश्वविक्रम केलेली सोलापूरची कन्या कु. कीर्ती भराडिया, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपला विक्रम नोंदवलेले परभणी जिल्ह्यातील डॉ. श्री राजगोपाल कालाने आणि मा. सामाजिक न्यायमंत्री तथा विद्यमान आमदार मा. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.


बहुप्रतिक्षित अशा पोदार जलतरण तलावाची वैशिष्ट्ये म्हणजे ८० फूट लांबीचा जलतरण तलाव, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तज्ञ प्रशिक्षक आणि सुरक्षारक्षकाची व्यवस्था, अतिशय उत्कृष्ट फिल्टरेशनचे व्यवस्था, निऑन लाईट द्वारे फवारे लहान मुलांसाठी बेबी पुलची व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र बॅच व प्रशिक्षक, लॉकर रूमची व्यवस्था आणि शॉवर बाथ, रेन डान्स, प्रदूषणमुक्त निसर्गरम्य वातावरण, कॅफेटेरिया, तणाव मुक्तीसाठी अद्वितीय असं ठिकाण. या ठिकाणी जन्मदिवस छोटे मोठे कार्यक्रम, गेट-टुगेदर, यासारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी ही जागा खास आपल्या सेवेत सादर होत आहे. दिनांक 22 ते 31 मार्च 2023 दरम्यान परिसरातील नागरिकांना हे ठिकाण पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.


पोदार स्विमिंग अरेनाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता तथा दिग्दर्शक मा. श्री प्रशांतजी दामले आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री कविता मेढेकर प्रस्तुत 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या कौटुंबिक नाटकाचे आयोजन दि. २३ मार्च २०२३ रोजी पोदार स्कूलच्या प्रांगणात सायंकाळी ७ वा. केले आहे. या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी व उद्घाटनाचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. चंदुलालजी बियाणी व सचिव मा. श्री. बद्रीनारायणजी बाहेती यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार