MB NEWS:खाडे बंधूंची सत्यनिष्ठा: अजूनही आपुलकी आणि विश्वासार्हता जपणारी माणुसकीची माणसं असल्याचे उदाहरण

 खाडे बंधूंची सत्यनिष्ठा: अजूनही आपुलकी आणि विश्वासार्हता जपणारी माणुसकीची माणसं असल्याचे उदाहरण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       सध्याच्या जमान्यात संपत्तीचा मोह व व्यवहारात जागोजागी बसणारे धोके लक्षात घेता एकमेकांच्या शब्दावरचा विश्वास उडत चाललेला काळ आहे. परंतु अशाही काळात दिलेल्या शब्दाला जागणारी आणि सत्य निष्ठेला अंगीकारणारी माणसे आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. अशाच प्रकारचे उदाहरण परळी येथील खाडे बंधूंनी दाखवून दिले आहे.

          अजूनही आपुलकी आणि विश्वासार्हता जपणारी माणुसकीची माणसं असल्याचे उदाहरण खाडे बंधूंनी दाखवून दिले आहे. याचे झाले असे की, गेल्या अनेक वर्षापासून सबरस व्यवसाय समूहाचे अग्रवाल बंधू यांची राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात सर्वपरिचित अशी जागा आहे. या व्यापार संकुलात अनेक वर्षांपूर्वी खाडे बंधूंना सलूनसाठी ही जागा व्यक्तिगत स्तरावर भाडेतत्त्वावर दिलेली होती. अनेक वर्षाचा काळ खाडे बंधूंचे हे दुकान याच ठिकाणी आहे. वर्षानुवर्षे कब्जात असलेली लक्षावधी रुपयांची जागा सोडताना प्रत्येक कब्जेदाराला मोह हा नक्कीच होतो. मात्र अग्रवाल यांनी विनंती केल्यानंतर कुठलाही मोह उराशी न बाळगता मुकुंदराव खाडे, व्यंकट खाडे, भगवान खाडे व गणेश खाडे या बंधूंनी ही जागा मूळ मालक असलेल्या अग्रवाल यांना विनाअट सुपूर्द  केली. सत्यनिष्ठा व विश्वासार्हता जपण्याचा एक आदर्श व्यवहार खाडे बंधूंनी दाखवून दिला आहे. याबद्दल खाडे बंधूंचे सबरस ग्रुपचे अग्रवाल बंधू यांनी आभार व्यक्त केले. तसेच त्यांचा सत्कारही केला. यावेळी नेमीचंद अग्रवाल, भारत अग्रवाल, सतीश अग्रवाल, उमेश अग्रवाल, नीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !