MB NEWS:सेलू, नंदनज, सारडगांव येथे जलजीवन मिशन कामाचा थाटात शुभारंभ

 मागील अडीच वर्षे पारतंत्र्यात गेली, आता मतदारसंघाला पुन्हा नवे दिवस आणू - पंकजाताई मुंडे




सेलू, नंदनज, सारडगांव येथे जलजीवन मिशन कामाचा थाटात शुभारंभ


मंत्रीपदाचा प्रत्येक क्षण गांवच्या विकासासाठी खर्च केला


महिला विकास करू शकत नाही, हा अपप्रचार खोडून काढा


परळी वैजनाथ ।दिनांक २१।

लोकनेते मुंडे साहेबांनी गावोगांवच्या विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, आता ते आपल्यात नसले तरी त्यांची उणीव भासू नये यासाठी मंत्रीपदाचा प्रत्येक क्षण तुमच्या विकासासाठी खर्च केला. तुमची मागील अडीच वर्षे पारतंत्र्यात गेली, हाती काहीच लागलं नाही पण आता मतदारसंघाला पुन्हा नवे दिवस आणायचेतं, त्यासाठी मला दत्तक घेऊन आशीर्वाद द्या असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांना केलं.


   सेलू परळी, नंदनज आणि सारडगांव येथे सुमारे चार कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण   पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते काल मोठया थाटात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.


   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, लोकनेते मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं ते केवळ  तुमच्या विकासासाठी.. त्यांच्या सूचनेनुसार मी प्रत्येक गावचा अभ्यास केला, तिथले प्रश्न समजावून घेतले आणि ते सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.  पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी हजार, लाखाच्या पटीत निधी दिला, पण नंतर मंत्री झाल्यावर तोच निधी कोटीत दिला. मंत्रीपदाचा जेवढा वेळ होता तो सर्व तुमच्यासाठी खर्च केला. दवाखान्यापासून ते स्मशानभूमी पर्यंत प्रत्येक गावाला न मागता निधी दिला. श्रेय घेण्यासाठी मी कधीच कामं केलं नाही पण मला आता ते करावं लागतयं. माझ्या माता भगिनींचे कष्ट कमी व्हावेत यासाठी ही योजना आणली असल्याचे त्या म्हणाल्या.


*हा अपप्रचार खोडून काढा*

-------------

गावचा विकास साधण्यासाठी स्त्री-पुरूष असा भेदभाव नसतो. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. गावचा विकास करण्यासाठी पुरूषच हवा, स्त्री काही करू शकत नाही असा जो अपप्रचार सध्या होत आहे तो खोडून काढा. स्त्री जसं घर सावरते तसा मतदारसंघ मी सावरला, विकासाची कामे करू शकले. चांगली पिढी घडविण्याचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळे चांगल्या माणसाच्या पाठिशी उभे रहा, त्यांना ताकद द्या असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी केले.


*गावोगावी दिवाळी ; जल्लोषात स्वागत* 

------------

कार्यक्रमाच्या निमित्ताने सेलू, नंदनज आणि सारडगांव या तीन गावात पंकजाताई मुंडे यांचे    ग्रामस्थांनी जोरदार व तितक्याच जल्लोषात वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत जेसीबीने फुलांची उधळण करत  जोरदार स्वागत केले.  प्रत्येक ठिकाणी माय माऊलीनी त्यांचे औक्षण केले. 


   कार्यक्रमास व्यासपीठावर वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, श्रीहरी मुंडे, श्रीराम मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, राजेश गिते, प्रा. पवन मुंडे, डाॅ. शालिनीताई कराड, ॲड जगन्नाथ मुसळे, संजय मुंडे, रवि कांदे, सेलूच्या सरपंच शिवकन्या फड, बालासाहेब फड, दत्तात्रय गुट्टे, नंदनजच्या सरपंच शिवकन्या गुट्टे, सुनंदा गुट्टे, सुनील गुट्टे, अनिल गुट्टे, सारडगावचे सरपंच राजेभाऊ आघाव आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !