MB NEWS:खाजगी दवाखान्यांमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा बंधनकारक करा - संभाजी ब्रिगेडची मागणी

 खाजगी दवाखान्यांमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा बंधनकारक करा - संभाजी ब्रिगेडची मागणी




परळी वैजनाथ.....


परळी शहरातील खाजगी दवाखान्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून या खाजगी दवाखान्यामध्ये रुग्णांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पण या खाजगी दवाखान्यामध्ये ऑनलाइन द्वारे पेमेंट घेतले जात नसून नगदी मध्येच पेमेंट घेतले जात आहे. असे न होता ऑनलाईन पेमेंट सर्व दवाखान्यांना बंधनकारक करण्यात यावे. असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वैद्यकीयअधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार साहेब परळी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. 

    देशाचे पंतप्रधान यांनी ऑनलाईन सेवा सर्व क्षेत्रांमध्ये सुरू केली आहे. आज आपण बघत असाल तर बूट पॉलिश ते  भाजी विक्रेत्या पर्यंत सर्वांकडे ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे. सर्व मेडिकलवर सुद्धा ऑनलाईन ची सुविधा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये परळीतील खाजगी दवाखान्यांमध्ये ऑनलाईनची सुविधा का उपलब्ध  नसावी ?  बहुतांश दवाखाने ऑनलाईन पेमेंट द्वारे रुग्णांचे बिल का पेड करत नसावेत ? ही बाब योग्य नसून खाजगी दवाखान्यात तात्काळ ऑनलाईन पेमेंट कंपल्सरी करावे. तसेच रात्रीची व दिवसाची वेगळी फीस न घेता एकच फीस घेण्यात यावी अशी बुधवार दिनांक 29 मार्च रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे परळी वै तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार