MB NEWS:शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे १५० पी.एचडी. संशोधक बळी

 शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे १५० पी.एचडी. संशोधक बळी

अपात्र मागासवर्गीय संशोधकाचा सरकारला आत्महदनाचा इशारा


नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रातून १५० मागासवर्गीय पी.एचडी.संशोधक विद्यार्थ्यांना नागपूरच्या महाज्योती संस्थेने अपात्र ठरवित त्यांना फेलोशिप नाकारुन त्यांच्या सर्वाच्च संशोधनाचा मार्गच बंद केला असून शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे हे १५० विद्यार्थी संशोधक बळी ठरले आहेत. पी.एचडी. नोंदणीच्या तारखेचा विद्यापीठांनी केलेला घोळ हा विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कारणीभूत ठरला आहे. फक्त नोंदणीचा दिनांक चुकीचा ठरवित १५० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फेलोशिप नाकारण्यात आली आहे. या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी अपात्र संशोधकांनी महाज्योती, स्थानिक विद्यापीठाचे कुलगुरु, मंत्री महोदय सावे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे  यांच्या पर्यंत प्रत्येक बाबीचा पाठपुरावा केला. त्यांना यात विद्यार्थ्यांची कोणतीही चुक नाही हे निदर्शनास आणून दिले. मात्र सरकारने संशोधकांची बाजू ऐकली नाही. फक्त आश्वासन दिले.

फंड आला की देतो, सरकार सोबत चर्चा करतो, तुमचे काम नक्कीच होणार अशी आश्वासने आता पर्यंत दिली आहे. मात्र आता आश्वासनाची वेळ निघून गेली असून, आता १५० अपात्र संशोधकांनी फेलोशिपकरीता मात्र ठरविण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला आहे. शिंदे सरकारने सरळ सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना सरकारने ठेवला नाही. बोलावून त्यांना संशोधकांच्या फेलोशिपमध्येअडचण ठरलेली चुकीची नोंदणी दिनांक व्यवस्थित करुन देण्याचा आदेश द्यावा अशी मागणी सुद्धा पात्र संशोधक करीत आहेत. ज्याप्रमाणे सारथी, बार्टीने नोंदणी दिनांकाची चुक मान्य करीत सर्वच संशोधकांना फेलोशिप मान्य केली त्याच धर्तीवर महाज्योतीसुद्धा १५० अपात्र संशोधकांना न्याय द्यावा. विशेष बाब म्हणजे, या अपात्र संशोधकांमध्ये मोठया प्रमाणात गरीब वर्गातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आता तरी सरकारने १५० अपात्र विद्यार्थ्यांच्या समस्येचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा अन्यथा आंदोलनाशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नाही.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार