MB NEWS:उड्डाण पुलावरील 'त्या, कथित अपघात प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

 उड्डाण पुलावरील 'त्या' कथित अपघात प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...
           काल दिनांक २५ रोजी प्रथमदर्शनी अपघाताची घटना घडल्याची नोंद झाली होती मात्र नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यावरून पोलिसांनी सखोल चौकशी करून या कथित अपघात प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
  
याप्रकरणी पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, मयत नामे संपती भारत पारवे वय 23 वर्षे रा. डाबी ता परळी याने व यातील आरोपी नामे राम बाबु पारवे रा. डाबी याची भावजई हिची मागील तीन महीन्यापुर्वी हात धरून छेड काढली होती.या कारणावरुन यातील आरोपीने त्या गोष्टीचा मनात राग धरुन दिनांक 25/03/2023 रोजी 2.30 ते 3.30 वा. दरम्यान यातील मयत संपती पारवे हा त्याचा मित्र निकम केरबा एअंगडे याचेसह मोटार सायकलवरुन परळी कडुन नागापुरकडे जात असताना उड्डाणपुल संपत असलेल्या ठिकाणी इटके कॉर्नरचे जवळ परळी पाठीमागुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने स्वतः ताब्यातील पिकअप जिपने पाठीमागुन जोराची धडक देवून यातील मयताचे अंगावर पुन्हा पिकअप घालून जिवे ठार मारले व पाठीमागे बसलेल्या निकम केरबा एंगडे यास गंभीर जखमीकरुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन आरोपीविरुद्धगु. र. न व कलम गुरन 56/2023 कलम 302, 307 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         सदरची कामगीरी मा पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोलीस निरीक्षक श्री सलीम चाऊस सपोनि ठाकूर पोह बिक्कड,पोना शिंदे मस्के, कोकाटे दुर्गे यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार