MB NEWS:माहेरी निघालेल्या महिलेचा विनयभंग

 माहेरी निघालेल्या महिलेचा विनयभंग



बीड,  ःपतीसोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात घराबाहेर पडत माहेरी जाण्यासाठी बीड येथील बसस्थानकात येवून बसलेल्या एका 21 वर्षीय महिलेशी एका आरोपीने ‘मी तुमच्या पतीला ओळखतो, ते तिकडे आले आहेत, मी तुम्हाला त्यांच्यापर्यंत घेवून जातो’ असे म्हणत  रिक्षातून पेठ बीड ठाणे हद्दीतील उद्यानात नेवून विनयभंग करत मोबाइल हिसकावून पोबारा केला. हा प्रकार 5 मार्च रोजी पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास शहरातील यशवंतराव चव्हाण उद्यान (चमन)मध्ये घडला. 

 एका महिलेचे तिच्या पतीशी काही कारणावरुन 4 मार्च रोजी रात्री भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात ती महिला माहेरी जाण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास बीड बसस्थानकात येवून पुढील प्रवासासाठी थांबली होती. यादरम्यान एक अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आला. त्याने तिला आधार देत विचारपूस सुरु केली. भांडण झाल्याने माहेरी जात असल्याचे महिलेने त्याला सांगीतले. यावर आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत पहाटेच्या सुमारास ‘मी  तुम्हाला तुमच्या पतीकडे घेवून जातो’ असे म्हणत  रिक्षातून पेठ बीड ठाणे हद्दीतील उद्यानात नेले. तिथे महिलेने पती कुठे आहेत अशी विचारणा केली असता, त्याने महिलेशी झटापट करत तिचा विनयभंग केला, शिवाय महिलेचा मोबाइल हिसकावून घेत पलायन केले. यावेळी महिलेने आरडाओरड केला. या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीसांनी ्घटनास्थळी धाव घेत संबंधित पिडितेला जिल्हा रुग्णालयात हलवले. नंतर तिने घडलेला प्रकार शिवाजीनगर पोलीसांसमोर कथन केला. त्यावरुन अज्ञाताविरुध्द विनयभंग आणि चोरीचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलीसांनी तपास सुरु केला. परिसरातील काही सीसीटिव्ही फुटेज तपासले असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी सांगीतले.

----------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार