MB NEWS:पाडवा झाला, १४ एप्रिल जवळ आली; आनंदाचा शिधा कुठे गेला ?

 पाडवा झाला, १४ एप्रिल जवळ आली; आनंदाचा शिधा कुठे गेला ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांचा निवेदनाद्वारे सवाल

परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :

            पाडवा झाला, १४ एप्रिल जवळ आली मग आनंदाचा शिधा कुठे गेला ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे,रवी मुळे यांनी निवेदनाद्वारे विचारला आहे.

      महाराष्ट्र शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा मोठ्या थाटात करण्यात आली. परंतु, दिवाळी गेली, गुढी पाडवा गेला तरीही आनंदाचा शिधा वेळेत मिळाला नाही. आता १४ एप्रिलच्या निमित्ताने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला देण्याची घोषणा केली. ती घोषणा पण, सध्या कागदावरच आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे, रवी मुळे  यांनी एका निवेदनाद्वारे सवाल उपस्थित केला आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे, रवी मुळे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !