MB NEWS: ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला; शोकाकुल भावना व्यक्त करत कुटुंबियांचे केले सांत्वन

 पंकजाताई मुंडे यांनी घेतले खा. गिरीश बापट यांचे अंत्यदर्शन

ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला; शोकाकुल भावना व्यक्त करत कुटुंबियांचे केले सांत्वन


पुणे ।दिनांक २९।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे  दिवंगत ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी बापट कुटुंबियांचे सांत्वन केले.


   खासदार गिरीश बापट काही दिवसांपासून आजारी होते. रूग्णालयात उपचार घेत असताना आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंकजाताई मुंडे तातडीने पुण्याला रवाना झाल्या. दुपारी बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली. आ. माधुरीताई मिसाळ यावेळी त्यांच्यासमवेत होत्या. बापट यांच्या निधनाने आमचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !