MB NEWS:पंकज कुमावत पथकाची मोठी कारवाई: परळी ते गंगाखेड रोडवर ३३ लाखाचा गुटखा पकडला

पंकज कुमावत पथकाची मोठी कारवाई: परळी ते गंगाखेड रोडवर ३३ लाखाचा गुटखा पकडला



केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज  कुमावत हे रात्रीची गस्त घालीत असताना परळी-गंगाखेड रोडवर एका आयशर टेम्पो मधून गुटखा उतरून घेत असताना त्यांनी पकडला असून गुटखा व वाहतूक करणारा टेम्पो असा ५१ लाख रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.



अधिक माहिती अशी की, दि. १४ मार्च साहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, हेडपोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी दराडे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक विकास चोपणे, वाहन चालक वंजारे हे जिल्हा रात्रगस्त घालीत असताना परळी शहर येथे आले असता सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक आयशर टेम्पो क्र. (एच आर६९/ डी-२३०२) मध्ये राजनिवास गुटख्याचा माल भरलेला असून सदरचा टेम्पो परळी ते गंगाखेड जाणारे रोडवर एन के देशमुख यांचे इंडियन पेट्रोल पंपाचे बाजूला उभा करून त्यातील माल खाली उतरून घेत आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली दोन पंचांना सोबत घेऊन सदर  ठिकाणी  दि. ५ मार्च मध्यरात्री १२:१५ वा. च्या सुमारास पोलीस पथकाने छापा मारला. त्या ठिकाणी गुटख्याचा माल घेऊन जणारे पिक-अप व टेम्पोतील गुटख्याचे पोते उचलनरे लोक पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. परंतु आयशर टेम्पो व टेम्पो चालक जागीच मिळून आले. त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव साबेर सौंदाना सुन्नी रा. सुनेडा ता. पुनाना (हरियाणा) असे सांगितले. त्याचे ताब्यातील आयशर टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला गुटख्याचे ६९ मोठे भोद व  सुगंधी तंबाखूचे १४ मोठे  भोद असा एकूण ३३ लाख २१ हजार ६०० रू. किंमतीचा गुटखा आणि आयशर टेम्पो असा ५१ लाख ३६ हजार ६०० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. अधिक चौकशी केली असता सदरचा माल इंदोर येथील व्यापाऱ्या कडून आणून परळी येथील व्यापाऱ्यास देणार असल्याचे सांगितले.
या प्रकरणी सहाय्यक फौजदार मुकुंद शामराव ढाकणे यांचे फिर्यादी वरून वरून पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !