इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:संघटनात्मक बाबींवर झाली चर्चा ; आमदारांसह पदाधिकारी उपस्थित

 पंकजाताई मुंडे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली भेट



संघटनात्मक बाबींवर झाली चर्चा ; आमदारांसह पदाधिकारी उपस्थित


मुंबई । दिनांक १४।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात भेट घेतली. संघटनात्मक तसेच विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.


   प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात आले होते, विक्रांत पाटील हे देखील त्यांच्यासमवेत होते. पंकजाताईंनी यावेळी त्यांचे स्वागत केले. या दोघांमध्ये संघटनात्मक तसेच विविध विषयांवर चर्चा झाली. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, सदाशिव खाडे, विजयकांत मुंडे, देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, विष्णू घुले, गञेश पुजारी, अरूण राऊत आदी जिल्हयातील भाजपचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.


वरळी ऑफिस नेहमीप्रमाणेच फुल्ल !

-------------

पंकजाताई मुंडे यांनी आज दिवसभर वरळी ऑफिसमध्ये सर्व सामान्य जनता व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्याची सोडवणूक केली. सामान्य गरजू गरीब माणसांपासून ते होतकरू तरूण, आमदार, जिल्हा पदाधिकारी, विविध लोकप्रतिनिधी ते अगदी प्रदेशाध्यक्षांपर्यंत आज दिवसभर कार्यालय नेहमीप्रमाणे फुल्ल होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!