MB NEWS:बँकेतून पैसे काढणाऱ्यांची अगोदर करायची रेकी आणि युक्तीने पळवायचे रक्कम: आंध्रातील दोघांना पकडले

 बँकेतून पैसे काढणाऱ्यांची अगोदर करायची रेकी आणि युक्तीने पळवायचे रक्कम: आंध्रातील दोघांना पकडले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      परळीतील बँकेतून पैसे काढणाऱ्यांची अगोदर करायची रेकी आणि युक्तीने पळवायचे रक्कम अशा अनेक घटना परळीत घडल्या होत्या.याप्रकरणी परळी शहर पोलीसांनी आंध्रातील दोघांना पकडले आहे.
       पोलीस ठाणे परळी शहर येथे दिनांक 30/01/2023 रोजी फिर्यादी नामे सूर्यकांत वैजनाथअप्पा खोत वय 67 वर्षे व्यवसाय. पिगमी एजेंट रा. नांदुरवेस परळी वै. ता. परळी वै. यांनी दि.0/01/2023 रोजी फिर्याद दिली की, दि. ३०/०१/२०२३ रोजी मी दि. २७/०१/२०२३ ते २९/०९/२०२३ चे पिगमीचे पैसे शनिवार, रविवार सुट्टी असल्याने दि. ३०/०१/२०२३ रोजी साडे अकरा ते बारावाजण्याच्या सुमारास मी पिगमीचे जमा केलेले पैसे ६९,४५०रुपये एका लाल रंगाच्या पीशवीत मोटार सायकल्या हन्डला आडकावुन घेवुन बैजनाथ बक मध्ये भरणे कामी जात असताना माझी स्पेलेन्डर कंपनीची मोटार सायकल ने MH ४४२६१४ ही पिटर इंगलड या दुकान समोर पार्किंग करुन मी उभा असताना पाठी मागुन मोटार सायकल वर दोन इसम तुमचे पैसे खाली पडले आहेत. ते तुमचे आहेत का असे म्हणल्यावरुन मी ते पैसे घेण्यासाठी खाली वाकलो असता माझ्या गाडीला अडकवलेली लाल रंगाची कापडी पिशवी ज्या मध्ये पैसे असलेली त्या मोटार सायकल वरील एका अनोळखी इसमाने काढून घेवून गाडीवर पाठी मागे बसून पळुन गेला, वैगेरे मजकुराचे फिर्यादीवरुन गुरन 32/2023 कलम 379, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहा 1620 गुट्टे हे करत आहेत.तसेच फिर्यादी प्रभाकर बालाजी शिंदे रा. सोमेश्वर सृष्टी बँक कॉलनी परळी व यांनी दिनांक 03/01/2022 रोजी फिर्याद दिली की, वैद्यानाथ बँकेतुन 2,10,000/- रुपये काढून घेचुन जात असताना अनोळखी इसमांनी खाज येण्याचे पावडर अंगावर टाकुन फिर्यादीची 2,10,000/- रुपयाची बॅग पळवली त्यावरुन गुरन 06/2022 कलम 379,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि / सपकाळ करत आहेत.

        यातील आरोपी हे एखाद्या बँकेत जावन अगोदर रेकी करणे व पैसे काढून घेवून जात असताना त्यांचे अंगावर पावडर टाकुन व किंवा आजुबाजुला पैसे टाकुन व्यक्तीची दिशाभूल करून साथीदारांच्या मदतीने पैशाची बॅग पळवणे अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे सवयीचे आहेत. वरील गुन्हयाचे तपासात तपासी अधिकारी/ अमलदार यांनी गुन्हा घडला ठिकानावरील दुकानाचे CCTV फुटेज व बैद्यनाथ बँकेतील CCTV फुटेज चेक करून त्यानुसार आरोपीतांचा शोध घेण्यास सुरुवात करुन दिनांक 27/02/2023 रोजी 13.00 वा. सुमारास 1) पि. कुमार पि. सुब्बाराव वय 45 वर्ष 2. पि. दुर्गाप्रसाद पि. नागराज दोन्ही रा. तिप्पा ता. कावाली जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश हे यांना वैद्यनाथ बँकेजवळ चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना मिळुन आले त्यांना सदर गुन्हयात दिनांक 27/02/2023 रोजी 22.58 वा. अटक करुन आरोपीकडुन गुन्हयात वापरलेली मोसा क्र. MH-24 AR-6057 व नगदी 12210/- रुपये जप्त केले आहे, व आरोपी पि. दुर्गाप्रसाद पि. नागराज रा. तिप्पा ता. कावाली जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश यांनी व ईतर साथीदारांनी दोन्ही गुन्हयात चोरी केलेली रक्कम 2,79,450/- रुपये ही आरोपीचे राहते गावी तिप्पा ता. कावाली जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथे तपासकामी जावुन आरोपीचे राहते घरातुन दिनांक 02/03/2023 रोजी रक्कम 1,89,740 ( एक लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस रुपये ) असा एकुण 2,21,950/- रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांकडून जप्त करण्यात आला आहे.

         ही कार्यवाही ही मा. श्री. नंदकुमार ठाकुर पोलीस अधिक्षक, बीड,  कविता नेरकर अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई उपविपोअ अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यू.एम. कस्तुरे सपोनि सपकाळ, पोह/ 1620 एस.एस. गुट्टे, पोह/562 केन्द्रे, पोअं 1439 राठोड, पोअं 1313 पांचाळ यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !