इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

 कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या




गेवराई तालुक्यातील राजापूर येथे घडली घटना ; बँकेसह खासगी लोकांचे होते पैसे

गेवराई ...


 मराठवाड्यामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोज राज्यात 8 पेक्षा जास्त शेतकरी मृत्युला कवटाळतात. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या होत असल्याचे पहावयास मिळते. गेवराई तालुक्यातील राजापूर येथील 40 वर्षीय शेतकर्‍याने बँक आणि खासगी कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सदरील शेतकर्‍याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.

Click:■ *श्रीराम जन्मोत्सव: डाॅल्बीच्या तालावर जय श्रीरामच्या जयघोष ; भव्य मिरवणूकीने परळी दुमदुमली.* #mbnews #subscribe #share #like #comments

कर्जबाजारीपणा, नापिकी व शेती मालाला नसणारा भाव यामुळे शेेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातल मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांची संख्या जास्त आहे. राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना आखत नाही. राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. मराठवाडा विभागात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होतात. गेवराई तालुक्यातील राजापूर येथील रामदास अंबादास उबाळे (वय 40 वर्षे) या शेतकर्‍याला तीन एकर जमीन आहे. सदरील शेतकर्‍याकडे बँक आणि खासगी लोकांचे पैसे होते, हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.


Advertise 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या