MB NEWS:जिल्हा परिषदेने घेतलेल्या इस्त्रो सहलीच्या परिक्षेत कपील गोपीनाथ कुंभारचे यशः गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

 जिल्हा परिषदेने घेतलेल्या इस्त्रो सहलीच्या परिक्षेत कपील गोपीनाथ कुंभारचे यशः गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना इस्त्रो व नासासाठी विद्यार्थ्यांची सहल काढण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषदेच्या वतीने अगोदर तालुका स्तरावर व नंतर जिल्हा स्तरावर परिक्षा घेण्यात आली. यातून ३३ विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. या ३३ विद्यार्थ्यांमध्ये गाढे पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेचा कपील गोपीनाथ कुंभार यांची निवड झाली आहे. याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार आला.

                    जिल्हा परिषदेचे वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अगोदर परिक्षा घेतली.प्रत्येक तालुक्यातून टाँप १० विद्यार्थी जिल्हा स्तरासाठी पात्र झाले. प्रत्येक तालुक्यातील दहा विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर परिक्षा घेण्यात आली. परळी तालुक्यातून जे दहा विद्यार्थी पात्र झाले होते. यामध्ये गाढे पिंपळगाव केंद्रीय जिल्हा परिषद शाळेचे ३ विद्यार्थी पात्र झाले. यातून जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या परिक्षेत कपील गोपीनाथ कुंभार हा इस्त्रो सहलीसाठी पात्र झाला आहे. गाढे पिंपळगाव गावकऱ्यांच्या वतीने कपील गोपीनाथ कुंभार सह या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी कपील कुंभारसह शाळेतील शिक्षकांचे यावेळी कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार