MB NEWS:अभूतपूर्व नोंदणी:मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

 ● परळीत गुढीपाडव्यापासून सुरु होतेय बाल संस्कार केंद्र: आदर्श शिक्षक सु.दे. लिंबेकर गुरुजींच्या हस्ते होणार उद्घाटन




अभूतपूर्व नोंदणी:मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

    सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परळीत बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात येत आहे. गुढीपाडव्यापासून हे बाल संस्कार केंद्र नियमित सुरु होत असुन आदर्श शिक्षक सु.दे. लिंबेकर गुरुजींच्या हस्ते  उद्घाटन होणार आहे. अभूतपूर्व नोंदणी झाली असुन उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

     स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्ट व नरवाडकर कोचींग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुढी पाडव्यापासून "बाल संस्कार केंद्र" सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांची बालमनं जपून त्यांच्या कलेने घेऊन संस्कारमूल्य रुजविण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्र लक्षात घेत त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या केंद्राद्वारे होणार आहे.या बाल संस्कार केंद्रामध्ये नोंदणी विनाशुल्क आहे.

       बाल संस्कार केंद्रामध्ये भगवद्गीता, देशभक्तीपर गीत,उत्सव संस्कृती, संगणक प्रशिक्षण, अन्न व पाणी बचत,रामरक्षा, बोधपर श्लोक, बोधकथा, शौर्य गीते व कथा, योग- प्राणायाम,तंत्रज्ञान माहिती,भाषण कौशल्य,ध्यान-साधना,पर्यावरण संरक्षण,भारतीय राज्यघटना, सामान्य ज्ञान,पसायदान,तज्ज्ञांचे मार्गदर्शन ,जीवदया, वैदिक गणित,परळी दर्शन, कार्यालयीन माहिती, बौध्दिक खेळ, लँग्वेज लॅब आदी  उपक्रम राबविले जाणार आहेत. 

            इयत्ता ३ री ते ७ वी वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी केंद्रात प्रवेश असेल.स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह श्री संस्थान काळाराम मंदिर, अंबेवेस, परळी वैजनाथ येथे दर रविवार सकाळी १० ते १२ संस्कार वर्ग होतील. तरी उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे  असे आवाहन आयोजक स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या)धर्माधिकारी, नरवाडकर कोचींग क्लासेस चे संचालक प्रा.अतुल नरवाडकर व स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने  करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार