MB NEWS:सैरभैर भाविकांना दिला परळीकरांनी आधार

 परळीजवळ प्रवासादरम्यान  ह्रदयविकाराचा झटका ;भाविकांना 'यात्रा घडवणाऱ्या' यात्राकंपनी व्यवस्थापकाची संपली 'जीवनयात्रा' !


सैरभैर भाविकांना दिला परळीकरांनी आधार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
      गुजरात मधील भाविकांना विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी व धार्मिक स्थळांवर यात्रा घडवून आणणाऱ्या एका यात्रा कंपनी व्यवस्थापकाला परळी जवळ येत असताना प्रवासादरम्यान बस मध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. अतिशय दुःखद अशा प्रकारची ही घटना आज दिनांक 15 रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. भाविकांना यात्रा घडवणाऱ्या या व्यवस्थापकाने यात्रा मार्गावरच आपली जीवन यात्रा संपवल्याची ही घटना घडली आहे.
         गुजरात राज्यातील यात्रा कंपनी ही महाराष्ट्रातील विविध देवस्थानांच्या ठिकाणी व तीर्थस्थळावर जाऊन देवदर्शन करण्यासाठी निघालेली आहे. गेल्या एक महिन्यापासून ही यात्रा गुजरातहून विविध धार्मिक स्थळांवर प्रवास करत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी या यात्रेकरूंची ट्रॅव्हल बस अंबाजोगाईहून परळी कडे येत असताना आज दिनांक 15 रोजी सकाळी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अंबाजोगाई -परळी रस्त्यावरील घाटात असतानाच अचानक या यात्रा कंपनीचे व्यवस्थापक असलेल्या श्री किशन जी राहणार सावरखेडा गुजरात यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसमधील भाविकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी परळीत आणले. परंतु उपचारासाठी दाखल होण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून परळी पोलिसांनी या घटनेबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन दिलेले आहे.
सैरभैर भाविकांना दिला परळीकरांनी आधार

दरम्यान, या यात्रा कंपनीचा व्यवस्थापकच असलेला इसम अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू पावल्याने बस मधून प्रवास करणाऱ्या गुजरातच्या विविध भागातील भाविकांची तारांबळ उडाली. संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन करणारी व नियोजन माहीत असलेली व्यक्तीच राहिली नसल्याने हे भाविक सैरभैर झाले होते. विशेष म्हणजे या यात्रेत प्रवास करणाऱ्या भाविकांना किशन जी यांची सविस्तर माहितीही नव्हती. बाहेर राज्यातील या भाविकांची ही सैरभैर अवस्था पाहून परळीतील पोलीस, नागरिक यांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्याचप्रमाणे परळीत मंगल कार्यालयाचे काम करणारे दत्ता शेटे यांनी प्रसंगावधान दाखवत बाहेर राज्यातील या भाविकांची सोय करण्यासाठी प्रयत्न केले. अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट येथे या सर्व भाविकांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी शेटे यांनी प्रयत्न केले. या घटनेतूनही परळीकरांनी एक एक प्रकारे माणुसकीचा मोठा आदर्श दाखवून दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !