MB NEWS:औष्णिक विद्युत केंद्रात ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाला सुरूवात

 कामगार सुरक्षिततेला महानिर्मितीत महत्व-मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे


 औष्णिक विद्युत केंद्रात ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाला सुरूवात


 परळी प्रतिनिधी


कामगारांची सुरक्षितता यातच महानिर्मितीची, राज्याची व राष्ट्राची उन्नती होय, त्यामुळे कामगारांची सुरक्षिततेला महत्व देऊन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे वीज निर्मिती चे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वतोरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांनी केले ते 

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  होते.


या वेळी सुरक्षितता अधीकारी एस बी उदार म्हणाले की, ट्रेड युनियन ह्या कामगारांमध्ये सुरक्षितता बद्दल जनजागृती व सुरक्षितता संस्कृती रुजविण्याचे मोठे माध्यम आहे.

मुख्य अभियंता भदाणे पुढे म्हणाले की, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरक्षेला सर्वोच्च प्रधान्य द्यावे. तसेच प्रसंगी सुरक्षितता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.


औ.वि.केंद्र, संच क्र ६ आणि ७ येथील प्रशासकीय  सभागृहात दि.४ रोजी  ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह साजरा करण्यात आली. हा सप्ताह दि ४ मार्च ते १० मार्च २०२३ पर्यंत पाळला जाणार आहे.या वेळीं सुरक्षा संबंधी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्र.उपमुख्य अभियंता एच.के.अवचार, अधीक्षक अभियंता आर पी रेड्डी, अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे , डी डी कोकाटे, चंद्रकांत मोराळे, डॉ. रांदड, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी ,कार्यकारी अभियंता मदन पवार,सुरेश गर्जे,जगन्नाथ देशमाने तसेच डी एन देवकते, वैजनाथ चाटे ,एम एम पाटील, एच डी गिते

इतर अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी व संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर मुंडे यांनी तर आभार बंनसीद्ध मेहेत्रे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार